News Flash

धक्कादायक! मुलगी झोपलेली असताना शेजारी भिंत ओलांडून घरात घुसला आणि…

मुलीने आरओरडा केल्यानंतर प्रकार उघडकीस

प्रातिनिधिक

घरात घुसून १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलगी झोपली असताना शेजाऱ्याने घरात घुसून मुलीवर लैंगिक अत्याचार केले. ग्रेटर नोएडा येथे ही घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून मुलीची वैद्यकीय तपासणी केली जात आहे.

पीडित मुलगी आपल्या भावा-बहिणींसोबत झोपली होती. शेजारी राहणाऱ्या आरोपीने भिंत ओलांडून घरात प्रवेश केला आणि बलात्कार केल्याचा आरोप आहे. मुलीच्या कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, आरोपीकडे बंदूक होती. बंदुकीचा धाक दाखवत त्याने लैंगिक अत्याचार केले.

आणखी वाचा- पुणे : डेटिंग अ‍ॅपवर भेटलेल्या तरुणाने केला बलात्कार; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

मुलीच्या रडण्याच्या आवाजामुळे कुटुंबीय जागे झाले आणि त्यांनी आरोपीला पकडून बेदम मारहाण केली. कुटुंबाने ग्रेटर नोएडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून आऱोपीला अटक केली आहे. दरम्यान पीडितेची वैद्यकीय चाचणी केली जात असून बलात्कार झाला आहे की नाही याची खात्री पोलीस करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 11, 2021 10:16 am

Web Title: man breaks into house and rapes 14 year old in greater noida sgy 87
Next Stories
1 नियमांचे उल्लंघन करुन बढती मिळवणाऱ्या अधिकाऱ्यांना योगी सरकारचा दणका; थेट चौकीदार, कारकून पदावर केली नियुक्ती
2 Coronavirus – देशात मागील २४ तासांत १९ हजार २९९ जण करोनामुक्त
3 मोदींनी पक्षांना दाणे खाऊ घातल्याने पसरला बर्ड फ्लू; ‘सपा’च्या नेत्याने मोदींवर साधला निशाणा
Just Now!
X