05 June 2020

News Flash

Lockdown मुळे बायकोला भेटता येत नसल्याने नवऱ्याने केली आत्महत्या

लॉकडाउनमध्ये दारु मिळत नसल्याने काही जणांनी आत्महत्या करुन जीवन संपवल्याच्या घटना घडल्या आहेत.

लॉकडाउनमध्ये दारु मिळत नसल्याने काही जणांनी आत्महत्या करुन जीवन संपवल्याच्या घटना घडल्या आहेत. उत्तर प्रदेशात एका माणसाने पत्नी विरहामुळे आत्महत्या केली. त्याने राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवलं. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.

मृत व्यक्तीची पत्नी लॉकडाउनमुळे तिच्या आई-वडिलांच्या घरी अडकली होती. तिला सासरी येणे शक्य नव्हते. पत्नीपासून हा दुरावा सहन होत नसल्याने त्याने आत्महत्या केली. बुधवारी गोंडामधील राधा कुंड भागात ही घटना घडली.

राकेश सोनी (३२) असे मृताचे नाव आहे. राकेश सोनीची पत्नी आई-वडिलांच्या घरी माहेरी गेली होती. लॉकडाउनमुळे ती तिथेच अडकली होती. राकेशला पत्नीची खूप आठवण येत होती. तो तिला मिस करत होता. हा विरह सहन होत नसल्याने त्याने आत्महत्या केली असे पोलीस निरीक्षक आलोक राव यांनी सांगितले. या प्रकरणात अधिक तपास सुरु आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2020 1:54 pm

Web Title: man commits suicide in up as he missed wife due to lockdown dmp 82
Next Stories
1 ओडिशा सरकारनं लॉकडाउन वाढवला; देशातील पहिलं राज्य
2 भारताचे संशोधक करोनावर शोधणार लस, ऑस्ट्रेलियाशी केला करार
3 ‘प्रेसिडंट तुमच्याशी पूर्णपणे सहमत, अशाच प्रसंगात मित्र जास्त जवळ येतात’, पंतप्रधान मोदी
Just Now!
X