News Flash

पाठलाग करुन प्रॉपर्टी डिलरची हत्या, जीव वाचवण्यासाठी गाड्यांच्या पाठीमागे लपण्याचा करत होता प्रयत्न

राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती

उद्यानामध्ये मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका ४० वर्षीय व्यक्तीवर तीन अज्ञात बंदुकधाऱ्यांनी हल्ला केला. जीव वाचवण्यासाठी तो जवळच असलेल्या अपार्टमेन्टच्या दिशेने पळाला. तिथे उभ्या असलेल्या गाडयांच्या पाठीमागे तो लपण्याचा प्रयत्न करत असताना आरोपींनी गोळया झाडून त्याची हत्या केली. बुधवारी सकाळी पूर्व दिल्लीतील प्रतापगंजमध्ये ही धक्कादायक घटना घडली.

राहुल सिंह नगर असे मृत व्यक्तीचे नाव असून २०१७ साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर त्याने विनोद नगर मतदारसंघातून महापालिकेची निवडणूक लढवली होती. राहुल सिंह नगर हे महापालिका निवडणूक लढवणाऱ्या श्रीमंत उमेदवारांपैकी एक होते. जवळपास साडेनऊ कोटीची संपत्ती त्यांनी दाखवली होती. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

राहुल सिंह यांची हत्या करणाऱ्या गुन्हेगारांची ओळख पटलेली नसून त्यांचा उद्देशही स्पष्ट झालेला नाही असे पोलिसांनी सांगितले. संपत्तीच्या वादातून ही हत्या झाल्याचा पोलिसांचा संशय आहे. राहुल सिंह नगर यांच्यावर चार गोळया झाडण्यात आल्या. रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती पोलीस उपायुक्त जसमीत सिंह यांनी दिली. राहुल सिंह पेशाने प्रॉपर्टी डिलर असून पत्नी आणि मुलीसह ते विनोद नगरमध्ये रहायचे. गुन्हा घडला त्या ठिकाणाहून एक किलोमीटर अंतरावर त्यांचे घर आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2020 10:12 am

Web Title: man gunned down in park chased inside an apartment complex and shot dead dmp 82
Next Stories
1 फटाके खायला देऊन हत्या करणं ही भारताची संस्कृती नाही, हत्तीणीच्या हत्येची केंद्राकडून गंभीर दखल
2 भारताचे संरक्षण सचिव अजय कुमार यांना करोना व्हायरसची लागण
3 लडाखमध्ये चीन दोन पावलं तर भारत एक पाऊल मागे
Just Now!
X