पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारच्या मंत्रिमंडळातील नवीन सदस्यांची यादी जाहीर झाली आहे. महाराष्ट्रातील भाजपाचे खासदार डॉ. भागवत कराड यांचाही समावेश आहे. कराड यांच्या रुपाने एका शेतकरी कुटुंबात जन्माला आलेली व्यक्ती थेट केंद्रीय मंत्री होणार आहे. डॉ. भागवत कराड नक्की कोण आहे त्यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास कसा राहिला आहे? यावर टाकलेली ही नजर…

कराड यांचं संपूर्ण नाव डॉ. भागवत किशनराव कराड असं आहे. त्यांचा जन्म १६ जुलै १९५६ रोजी एका शेतकरी कुटुंबामध्ये झाले. त्यांनी एमबीबीएस, एम.एस.(जनरल सर्जरी), एम. सीएच(पेडियाट्रीक) या पदव्यांचं शिक्षण घेतलं आहे. कराड हे मूळचे लातूरचे आहेत. डाॅ. कराड हे बालरोग शल्यचिकित्सक आहेत.

narendra modi, PM Narendra Modi,
हुकमी ‘नॅरेटिव्ह’ने यंदा मोदींना हुलकावणी दिली आहे का?
BJP tukde-tukde gang Kanhaiya Kumar interview delhi lok sabha election
“मी तुकडे-तुकडे गँगचा असेन तर मोदी मला अटक का करत नाहीत?”; कन्हैयाचं भाजपाला आव्हान
eknath shinde
महायुतीच्या सर्व जागा बहुमताने निवडून येणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा, म्हणाले ‘शेतकऱ्यांना मदत…’
Trinamool Congress MPs protesting in front of the Central Election Commission headquarters protested at the police station
तृणमूलचे ‘राजकीय नाटय़’; केंद्रीय तपास यंत्रणांविरोधात पोलीस ठाण्यात २४ तास ठिय्या आंदोलन

नक्की  वाचा >> Cabinet Expansion: अखेर ठरलं! मंत्रिमंडळ विस्तारात ‘या’ ४३ मंत्र्यांचा होणार समावेश, पाहा संपूर्ण यादी

शेतकरी कुटुंबात जन्मलेले डाॅ. भागवत कराड हे लातूरचे आहेत.  ‘डाॅ. कराड मल्टी स्पेशालिटी हाॅस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर’ हे त्यांचं स्वत:चं हाॅस्पिटल देखील आहे. १९९५ साली औरंगाबाद महानगरपालिकेच्या कोटला काॅलनी येथून ते अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले. नंतर दिवंगत भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांच्या सहकार्याने त्यांनी भाजपात प्रवेश केला.

१९९८ साली औरंगाबाद शहराचा उपमहापौर म्हणून त्यांची निवड झाली. नंतर १९९९ आणि २००६ असे दोन वेळा ते औरंगाबाद शहराचे महापौर होते. २००९ साली गोपीनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली. २०२० मध्ये डाॅ. कराड यांना भाजपाकडून राज्यसभेची खासदारकी देण्यात आली.

नक्की पाहा >> PM Modi Cabinet : मोदींच्या मंत्रिमंडळातून ‘हे’मंत्री OUT; राज्यातील दोन मंत्र्यांचाही समावेश

डाॅ. कराडांना खासदारकी देऊन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाच दगडात मुरब्बी राजकारणी एकनाथ खडसे आणि औरंगाबादच्या विजया रहाटकर असे दोन पक्षी मारल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. डाॅ. कराड हे ओबीसी नेते आहेत. त्यामुळे त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करत ओबीसी समाजाला शांत करण्याचा प्रयत्न भाजपाकडून करण्यात आल्याचं बोललं जात आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात ओबीसी चेहरा मिळाला तर महाविकासआघाडी सरकारला धारेवर धरणे महाराष्ट्राच्या दृष्टीने भाजपाला फायद्याचं ठरेल.

डॉ. भागवत कराड यांच्यासोबतच कपिल पाटील, डॉ. भारती पवार आणि नारायण राणेही केंद्रात मंत्री झाले आहेत. मोदी दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच केंद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तार झालाय. यात एकूण चार खासदारांना संधी मिळाली आहे तर केंद्रातील महाराष्ट्र भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि ग्राहक संरक्षण आणि नागरीपुरवठा खात्याची जबाबदारी असणाऱ्या रावसाहेब दानवे-पाटील यांनी राजीनामा दिला आहे. त्याचबरोबर भाजपाचे अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांनी सुद्धा आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिलाय.