दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष आणि वर्णभेदविरोधी लढ्याचे अग्रणी नेल्सन मंडेला यांची आज १०१ वी जयंती. मादिबा नावाने आफ्रिकेमध्ये लोकप्रिय असलेल्या मंडेला यांचे जीवन संघर्षमय होते. त्यांना ‘आफ्रिकेचे महात्मा गांधी’ या नावानेही ओळखले जाते. आज त्यांच्या जयंतीनिमित्त जाणून घेऊयात त्यांच्याबद्दलच्या खास गोष्टी…

१)
१८ जुलै १९१८ ला जन्मलेल्या नेल्सन मंडेलांनी साम्राज्यवाद, गरिबी आणि वंशभेदाचं उच्चाटन करण्यासाठी अतुलनीय लढा दिला.

२)
मंडेला यांना ‘मादिबा’ या नावानेही आफ्रिकेत ओळखले जाते.

३)
मंडेला १९९४ ते १९९९ या काळात दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष होते. वर्षानुवर्षे ‘काळे’ म्हणून हिणवल्या गेलेल्या समूहातील ते पहिले राष्ट्राध्यक्ष.

४)
सामाजिक समतेच्या मुल्यांसाठी त्यांनी आयुष्यभर दिलेल्या लढ्यामुळे मंडेला हे जगभरात वर्णभेदविरोधी संघर्षाचे प्रतिक म्हणून ओळखले जातात.

५)
दक्षिण अफ्रिकेतील वर्णभेदी राजवटींविरुद्ध त्यांनी कडवा संघर्ष केला होता. या लढ्यामुळे त्यांना आपल्या आयुष्याची तब्बल २७ वर्षे तुरुंगात काढावी लागली.

६)
केपटाऊनपासून १० किलोमीटरवर असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या रोबेन बेटावर त्यांनी आयुष्याची २७ वर्षे बंदीवासात काढली.

७)
वर्णभेदाविरुद्ध लढताना मंडेला यांनी केलेल्या त्यागाची आठवण म्हणून संयुक्त राष्‍ट्रसंघानेही रोबेन बेटाला जागतिक वारशाचा दर्जा दिला आहे.

८)
रोबेन बेटावरील ज्या कोठडीमध्ये मंडेलांना डांबले होते तेथे आजही टेबलवर लोखंडाचे एक ताट व कप ठेवलेला आढळतो. जगभरातील पर्यटक येथे मंडेला यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी येतात.

९)
४६६/६४ हा मंडेला यांचा कैदी क्रमांक जगभर एड्सविरोधी मोहिमेचा आयकॉन म्हणून वापरला जातो

१०)
वर्णभेदी राजवटींविरुद्धच्या लढाईत मंडलेांचा विजय झाला. त्यानंतर लोकशाही मार्गाने दे दक्षिण अफ्रिकेचे अध्यक्षही बनले.

११)
दक्षिण अफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय अध्यक्ष बनण्याचा मान त्यांना मिळाला.

१२)
‘लाँग वॉक फॉर फ्रीडम’ हे त्यांचं आत्मचरित्र जगभर गाजलं. त्याचे अनेक भाषांमध्ये अनुवादही प्रकाशित झाले.

१३)
नेल्सन मंडेला यांनी विसाव्या शतकातल्या जवळपास सर्व महत्त्वाच्या उलथापालथी पाहिल्या.

१४)
मंडेला हे सत्याग्रह आणि गांधीवादाचे पुरस्कर्ते होते

१५)
१९९० साली भारत सरकारने मंडेला यांना देशातील सर्वोच्च अशा ‘भारतरत्न’ या नागरी पुरस्काराने सन्मानित केले

१६)
१९९३ मध्ये त्यांना शांततेचं नोबेलही प्रदान करण्यात आलं

१७)
२५० पेक्षाही अधिक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आलं आहे

१८)
त्यांना क्रिकेट आणि फूटबॉल हे दोन्ही खेळ प्रचंड आवडायचे.

१९)
मंडेला यांना फुप्फुसांमध्ये संसर्ग झाला होता. मृत्यूच्या आधी अनेक महिने ते रुग्णालयात दाखल होते. मात्र शेवटच्या काही दिवसांमध्ये त्यांच्यावर राहत्या घरीच उपचार सुरु होते.

२०)
मंडेला यांचे ५ डिसेंबर २०१३ रोजी निधन झाले.