हैदराबादमधील तीन तर वर्धा येथील एका ठिकाणी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) पथकाने शनिवारी सकाळी छापा टाकला. आयसिस या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयातून ही कारवाई केल्याचे सूत्रांनी सांगितले.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, एनआयएच्या पथकाने शनिवारी सकाळी हैदराबादमध्ये तीन ठिकाणी तर वर्धा येथे एका ठिकाणी छापा टाकला. आयसिसशी संबंध असल्याच्या संशयातून एनआयएने ही कारवाई केल्याचे समजते. पथकाने या चार ठिकाणी झाडाझडती घेतली असून या कारवाईबाबत एनआयएने अधिकृत माहिती दिलेली नाही.

वर्धा येथील मसाळा परिसरातून तपास यंत्रणांनी एका महिलेला ताब्यात घेतले आहे. या महिलेला का ताब्यात घेण्यात आले, तिच्याकडे नेमके काय सापडले, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. या कारवाईबाबत तपास यंत्रणेकडून कमालीची गोपनीयता बाळगली जात आहेत