17 December 2017

News Flash

‘आम्हाला बघितल्यावर लादेनने सर्वांतआधी त्याच्या तरुण बायकोला पुढे ढकलले’

आम्हाला समोर बघितल्यावर ओसामा बिन लादेनने सर्वांत आधी त्याच्या तरुण बायकोला आमच्यापुढे ढकलले. तिथे

वॉशिंग्टन | Updated: February 12, 2013 12:33 PM

आम्हाला समोर बघितल्यावर ओसामा बिन लादेनने सर्वांत आधी त्याच्या तरुण बायकोला आमच्यापुढे ढकलले. तिथे जवळच असलेली एके ४७ उचलण्याचा त्याचा इरादा होता. मात्र, त्याने कोणतीही हालचाल करण्याआधीच आमच्या गोळीने अचूक नेम टिपला होता… पाकिस्तानातील अबोटाबादमध्ये जाऊन अमेरिकेच्या सैनिकांनी लादेनला त्याच्या घरातच ठार मारले. जगातील प्रत्येकासाठी अतिशय़ कुतूहलाचा विषय ठरलेल्या या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावणाऱया एका सैनिकांनी कारवाईच्यावेळी घडलेल्या घडामोडींवर प्रकाश टाकला. एका नियतकालिकाला त्याने नुकतीच मुलाखत दिली. मात्र, त्याने आपली ओळख गुप्त ठेवली आहे.
आम्हाला बघितल्यावर तो खरंतर गोंधळून गेला होता. माझ्या अंदाजापेक्षा तो जरा जास्तच उंचही होता. त्याने सगळ्यात स्वतःच्या बायकोच्या खांद्यावर हात ठेवून तिला पुढे केले. तिथेच जवळ एके ४७ होती. ती हातात घेऊन त्याने काहीही करायचा आतच मी त्याच्या कपाळावर दोन गोळ्या झाडल्या. तो तिथेच त्याच्या बेडजवळ खाली कोसळला. मी परत त्याच्या कपाळावर गोळ्या झाडल्या, या शब्दांत अमेरिकी सैनिकाने आपल्या त्यावेळच्या कारवाईची आठवण सांगितली.
आमच्या गोळ्यांमुळे लादेनचा मृत्यू झाला होता. तो निपचित पडला होता. त्याची जीभही बाहेर आली होती, अशी आठवण याच कारवाईतील आणखी एक सैनिक मॅट बिसनेट याने आपल्या ‘नो ईझी डे’ या पुस्तकात लिहिली आहे. पुस्तकाच्या माध्यमातून गोपनीय माहिती उघड केल्याचा आरोप पेंटागॉनमधील अधिकाऱयांनी बिसनेटवर केला आहे.

First Published on February 12, 2013 12:33 pm

Web Title: osama pushed his youngest wife ahead of him as he faced us says navy seal