इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि हार्ट केअर फाऊंडेशनचे प्रमुख पद्मश्री डॉ. केके अग्रवाल (वय 62) यांचे सोमवारी रात्री 11.30 च्या सुमारास करोना संसर्गामुळे निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना एम्समधील ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल केले होते. तीन दिवसांपूर्वी प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरच्या आधारावर ठेवण्यात आले होते.

दोन महिन्यांपूर्वी डॉ. केके अग्रवाल यांनी करोना लसीचे दोन्ही डोस घेतले होते. परंतु गेल्या महिन्यात त्यांना संसर्ग झाला होता. अग्रवाल यांना करोना संसर्ग झाल्यानंतर एम्सच्या आयसीयूमध्ये दाखल केले होते. केके अग्रवाल यांनी 28 एप्रिल रोजी आपल्या ट्विटर अकाऊंटवर माहिती दिली होती की त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉ.के.के.अग्रवाल हे त्यांच्या व्यवसायामुळे प्रसिद्ध होते. प्रत्येकाने करोना कालावधीत त्यांचा चांगुलपणा पाहिला. संकटाच्या वेळी त्यांनी हजारो लोकांना मदत केली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल रूग्णांवर त्यांनी विनामूल्य उपचार केले. करोना संकटाच्यावेळी ते नेहमी वॉरियर्स म्हणून उभे राहिले, पण दुर्दैवाने त्याच करोनाबरोबर ते आयुष्याची लढाई हारले. २०१० साली अग्रवाल यांना पद्मश्री पुरस्काराने देखील गौरविण्यात आले होते.