06 July 2020

News Flash

पाकिस्तानी लष्कराच्या कारवाईत २३ दहशतवादी ठार

उत्तर वझरीस्तानातील दहशतवादी तळांवर पाकिस्तानी लष्कराने शुक्रवारी रात्री मोठी कारवाई केली.

| December 27, 2014 04:26 am

उत्तर वझरीस्तानातील दहशतवादी तळांवर पाकिस्तानी लष्कराने शुक्रवारी रात्री मोठी कारवाई केली. पाकिस्तानी लष्कराने केलेल्या हवाई हल्ल्यात २३ दहशतवादी ठार झाले असून,  हल्लानंतर एका बोगद्यात दहशतवाद्यांनी लपविलेला शस्त्रास्त्रांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे.
उत्तर वझिरीस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून दहशतवाद्यांविरोधात १५ जूनपासून मोहिम सुरू करण्यात आली आहे. या मध्ये आतापर्यंत १२०० हून अधिक दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले आहे. मागच्या आठवडयात तालिबानी दहशतवाद्यांनी पेशावरमधील लष्करी शाळेवर हल्ला करुन, निष्पाप विद्यार्थ्यांचे बळी घेतल्यानंतर पाकिस्तानी सैन्याने पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवरील दहशतवाद्यांविरोधात जोरदार मोहिम उघडली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 27, 2014 4:26 am

Web Title: pakistan airstrikes kill 23 militants in north waziristan
टॅग Army,Militant,Pakistan
Next Stories
1 मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेलांनी घेतली मोदींची भेट
2 भाजपने कलम ३७० आणि ‘अफास्पा’विषयी हमी द्यावी- पीडीपी
3 झारखंडच्या मुख्यमंत्रिपदी रघुवर दास
Just Now!
X