News Flash

पाकिस्तानच्या अध्यक्षांकडून हिंदूंना दिवाळी शुभेच्छा

पाकिस्तानचे अध्यक्ष ममनून हुसेन यांनी आज रविवार एका संदेशाद्वारे हिंदू बांधवांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. आपले पाकिस्तानात सरकार अल्पसंख्यांक समाजाच्या कल्याण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न करत राहील असेही

| November 4, 2013 02:28 am

अल्पसंख्याकांच्या हिताचे रक्षण करण्यास सरकार बांधील असल्याची ग्वाही देत पाकिस्तानचे अध्यक्ष मम्मून हुसेन यांनी आपल्या देशातील हिंदू बांधवांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन त्यांचे अभीष्टचिंतन केले.
दिवाळीचा अविस्मरणीय दिवस तुमच्या आयुष्यात अधिकाधिक आनंद निर्माण करो, अशी आपली इच्छा असल्याचे हुसेन यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
फोटो गॅलरी: दिवाळी सेलिब्रेशन..
देशातील अल्पसंख्याकांचे कल्याण साधत त्यांच्या मूलभूत हक्कांचे रक्षण, त्यांचे जीवनमान व मालमत्तेचे रक्षण करण्याप्रती सरकारची बांधीलकी असल्याचे आश्वासन हुसेन यांनी दिले.घटनेने घालून दिलेल्या तत्त्वांच्या आधारे आपले प्रयत्न आहेत, असे सांगून पाकिस्तानची उन्नती आणि परस्परांमध्ये सलोखा निर्माण व्हावा म्हणून हिंदूंनी  बहुमोल योगदान द्यावे, असे आवाहन हुसेन यांनी केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2013 2:28 am

Web Title: pakistan president mamnoon hussain greets hindus on diwali
टॅग : Diwali
Next Stories
1 जास्त आवाजाचे फटाके उडविणाऱ्यांना अटक
2 अभिनेत्री श्वेता मेननची काँग्रेस खासदाराविरुद्ध फिर्याद दाखल
3 मुजफ्फरनगरमध्ये संक्रमण शिबीरात तरुणीवर सामूहिक बलात्कार
Just Now!
X