News Flash

लोकशाहीविरोधी वागणाऱ्या कुठल्याही शक्तीला जनतेनं सोडलं नाही, त्यांना धडा शिकवला – शरद पवार

"इंदिराजींसारख्या बड्या नेत्यालाही लोकांनी सत्तेपासून दूर ठेवलं"

(संग्रहित छायाचित्र)

देशातील लोकांच्या मनात लोकशाहीचा विचार रुजला आहे. त्यामुळे लोकशाहीविरोधात वागणाऱ्या कुठल्याही शक्तीला देशातील जनतेनं सोडलेलं नाही, त्यांना धडा शिकवला आहे, असं प्रतिपादन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलं आहे. देशातील एकूण राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी काही सूचक विधानंही केली आहेत.

शरद पवार म्हणाले, “आणीबाणीच्या काळात देशातील लोकशाहीच्या बाजूने भूमिका घेणाऱ्या हजारो लोकांना अटक करण्यात आली. यामुळे एक अजब स्थिती देशासमोर उभी राहिली. देशातील जनेच्या मनात लोकशाहीबाबत श्रद्धा आहे. त्यामुळे आणीबाणीनंतर लोकांना संधी मिळाली तर त्यांनी लोकशाहीविरोधात वागणारी कोणतीही शक्ती असो त्यांना धडा शिकवला. इंदिराजींसारख्या बड्या नेत्यालाही लोकांनी सत्तेपासून दूर ठेवलं. कारण लोकशाहीविरोधात छेडछाडी करण्याची त्यांची तयारी नव्हती.”

आणखी वाचा- दिल्ली पोलिसांनी FIR दाखल केल्यानंतर ग्रेटा थनबर्ग म्हणाली….

जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनातून समाजवादी विचारांची शक्ती समोर आली. त्यानंतर या विचारांवर चालणारे लाखो लोक पुढील अनेक वर्षात तयार झाले. देशाच्या हितासाठी त्यांनी काम केलं. दरम्यान, समाजवादी विचाराच्या कामगार संघटनाही देशभरात निर्माण झाल्या, अशा शब्दांत पवार यांनी समाजवादी विचारांचा पुरस्कार केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 4, 2021 4:35 pm

Web Title: people did not give up any anti democratic force taught them a lesson says sharad pawar aau 85
Next Stories
1 FIR मध्ये ग्रेटा थनबर्गचे नाव नाही, दिल्ली पोलिसांनी केलं स्पष्ट
2 शेतकरी आंदोलन : “साक्षात प्रभू रामचंद्र जरी पृथ्वीवर अवतरले व त्यांनी शेतकऱ्यांची बाजू घेतली तरी…”
3 दिल्लीच्या नायब राज्यपालांची वाढणार ताकद; केंद्रीय कॅबिनेटची सुधारणा विधेयकाला मंजुरी
Just Now!
X