News Flash

आतापर्यंत शहरांना झळाळी दिली, आता गावांसाठी काम करा; पंतप्रधान मोदी यांचं स्थलांतरित मजुरांना आवाहन

व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे केलं उद्घाटन

संग्रहित छायाचित्र

करोना व लॉकडाउनमुळे विस्थापित झालेल्या मजुरांच्या रोजगारासाठी केंद्र सरकारनं नवीन कार्यक्रम हाती घेतला आहे. केंद्र सरकारच्या वतीनं गरीब कल्याण रोजगार अभियान सुरू केलं असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. बिहारमधील खगरिया येथून या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला असून, यावेळी मोदी यांनी स्थानिकांशी संवाद साधला.

यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “अभियानाचा प्रारंभ करताना ग्रामस्थांशी संवाद साधल्यानं दिलासा मिळाला आहे. करोनाचा शिरकाव झाल्यानंतर अडकलेल्यांना मदत पोहोचवण्याचं काम केलं. घरी परतणाऱ्या मजुरांसाठी रेल्वे सुरू केली. करोनाचा संकट इतक मोठं आहे की संपूर्ण जग हादरलं आहे. पण, भारतीय खंबीरपणे उभे राहिले. ग्रामीण भारतानं करोनाचं संक्रमण प्रभावीपणे रोखलं आहे. ग्रामीण भागातील लोकसंख्या संपूर्ण युरोप, अमेरिका, रशियापेक्षा जास्त आहे. इतकी लोकसंख्या असताना करोनाचा यशस्वीपणे मुकाबला केला आहे. आपण जे केलं तितकं काम किंवा त्यापेक्षा अर्धे काम पाश्चिमात्य देशात झालं असतं, प्रचंड कौतुक झालं असतं. आपल्या देशातही काही लोक आहेत, जे तुमची पाठ थोपटणार नाहीत. पण, मी तुमचा जय जयकार करत राहणार आहे. गावांना आणि गावातील लोकांना सांभाळणाऱ्यांना मी नमन करतो,” असं मोदी म्हणाले.

आणखी वाचा- भारतातल्या खेड्यांनी करोनाशी सामना करत शहरांपुढेही आदर्श ठेवला- मोदी

“आजचा दिवस ऐतिहासिक आहे. लॉकडाउनच्या काळात आपापल्या घरी परतलेले मजूर आपल्या गावाच्या विकासासाठी काहीतरी करू इच्छित आहे. देशाला मजुरांच्या भावना व अपेक्षा समजतात. गरीब कल्याण रोजगार अभियान हे त्या दिशेनं टाकलेलं पाऊल आहे. आमचा प्रयत्न आहे की, या अभियानाच्या माध्यमातून मजुरांना घरच्या जवळच काम मिळावं. आतापर्यंत तुम्ही तुमच्या कौशल्याने व श्रमाने शहरांना झळाळी देत होते. पण, ते आता गावांसाठी करावे,” असं आवाहन मोदी यांनी केलं.

आणखी वाचा- गरीबांना रोजगार देणारी ५० हजार कोटींची नवी योजना आहे तरी काय?

५० हजार कोटींची योजना

लॉकडाउन लागू केल्यानंतर विविध राज्यात काम करणारे लाखो मजूर आपापल्या घरी परतले. घरी परतल्यानंतर या मजुरांना काम उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र सरकारनं गरीब कल्याण रोजगार अभियान सुरू केलं आहे. या अभियानासाठी ५० हजार कोटी रूपयांची घोषणा केंद्र सरकारनं केली आहे. यातून रस्ते बांधणीसह ग्रामविकासाला साहाय्यभूत ठरणाऱ्या कामातून रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2020 11:49 am

Web Title: pm modi launches garib kalyan rojgar abhiyan bmh 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 मोदीजी, चीनला उत्तर द्यावंच लागेल : जितेंद्र आव्हाड
2 VIDEO: …तर भारताचा नवीन पूलही आला असता चिनी तोफखान्याच्या रेंजमध्ये
3 “राहुल गांधींनी यात राजकारण करू नये”; जखमी जवानांच्या वडिलांचं आवाहन
Just Now!
X