News Flash

सुप्रिया सुळेंसमोर नरेंद्र मोदींची सभागृहात शरद पवारांवर टीका; म्हणाले…

मोदींनी वाचून दाखवलं शरद पवारांचं वक्तव्य

कृषी कायद्यांवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाण साधला आहे. शरद पवारांनी २००५ मध्ये एपीएमसी कायद्यात बदल करण्यासंबधी केलेलं वक्तव्य वाचून दाखवत नरेंद्र मोदींनी शरद पवारांवर टीका केली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान नरेंद्र मोदींनी बोलत होते. यावेळी सभागृहात सुप्रिया सुळे उपस्थित होत्या.

“एपीएमसी कायदा बदलला आहे असं कोण गर्वाने सांगत होतं, २४ असे बाजार उपलब्ध झाल्याचं कोण सांगत होतं…तर मनमोहन सिंग यांच्या सरकारमधील कृषीमंत्री शरद पवार बोलत होते. शरद पवार आज अचानक उलट बोलत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भ्रम निर्माण करण्यासाठी हा रस्ता का निवडला आहे अशी शंका येते,” अशी टीका नरेंद्र मोदींनी केली आहे.

नरेंद्र मोदी यांनी यावेळी शरद पवारांचं अजून एक उत्तर वाचून दाखवत म्हणाले की, “शेतकऱ्यांच्या बचावासाठीच एपीएमसीमध्ये बदल केले जात आहेत. शेतकऱ्यांना मंडईचा पर्याय मिळावा. जास्त व्यापारी नोंद झाल्यास स्पर्धा वाढेल आणि मंडईमधील जाळं संपेल असं त्यांनी सांगितलं होतं”. याशिवाय अनेक सरकारांनी कृषी कायद्यात बदल करण्याचे प्रयत्न केले आहेत असंही त्यांनी सांगितलं. भोजपुरीत एक गोष्ट आहे की, ना खेळणार, ना खेळून देणार असं सांगत नरेंद्र मोदींनी विरोधकांना टोला लगावला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2021 5:47 pm

Web Title: pm narendra modi sharad pawar farm laws supriya sule sgy 87
Next Stories
1 हा कसला तर्क…इथे काय सरंजामशाही आहे का?; पंतप्रधान मोदी लोकसभेत कडाडले
2 ‘आधार’विरोधात कोण कोर्टात गेलेलं?, मोदींच्या प्रश्नावर काँग्रेस म्हणाली, ‘तुम्हीच CM असताना…’
3 Farmer Protest: अडथळा आणण्याचा हा पूर्वनियोजित कट, कारण…; पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
Just Now!
X