News Flash

नाना पटोले व उदयनराजेंची सोनिया गांधींच्या निवासस्थानाबाहेर भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

भेटीनंतर पटोले म्हणाले, 'जस्ट वेट अॅण्ड वॉच..'

भेटीनंतर हस्तांदोलन करताना उदयनराजे व नाना पटोले. (Express photo by Anil Sharma)

राज्याच्या वर्तुळात नव्या चर्चेनं डोकं वर काढलं आहे. ही चर्चा आहे काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष नाना पटोल आणि राज्यसभेतील भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भेटीची. काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या भेटीसाठी नाना पटोले हे दिल्लीत असून, पटोल यांची उदयनराजे भोसले यांनी सोनिया गांधी यांच्या निवासस्थाबाहेर भेट घेतली. भेटीनंतर नाना पटोले यांनी ‘जस्ट वेट अॅण्ड वॉच..’ अशी सूचक प्रतिक्रिया दिल्यानं नवी चर्चा सुरू झाली आहे.

महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी विधानसभा अध्यक्ष आणि पक्षातील नेते नाना पटोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीनंतर नाना पटोले काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या सदिच्छा भेटीसाठी दिल्लीला गेले होते. दिल्लीत असताना भाजपाचे राज्यसभेतील खासदार उदयनराजे यांनी पटोले यांची सोनिया गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर भेट घेतली.

आणखी वाचा- नाना पटोले यांचं दिल्लीत मोठं विधान; सोनिया गांधींच्या भेटीनंतर व्यक्त केला निर्धार

या भेटीचा फोटोही समोर आला असून, त्यावरून राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. सोनिया गांधी यांच्या निवासस्थानासमोरून जात असताना उदयनराजेंना पटोले बाहेर दिसले. त्यामुळे त्यांनी गाडी थांबवून त्यांची भेट घेतली व प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन केलं, असं उदयनराजे यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना म्हटलं आहे. तर दुसरीकडे पटोले यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. “काँग्रेसला बळकटी देण्यासाठी इतर पक्षातील नेत्यांना सामावून घेण्याच्या दिशेनं काम सुरू आहे. ‘जस्ट वेट अॅण्ड वॉच..’ पुढे आश्चर्यकारक धक्के देऊ,” असं सूचक वक्तव्य पटोले यांनी भेटीनंतर केलं आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरू होती. मागील आठवड्यात नाना पटोले यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. नियुक्ती झाल्यापासून नाना पटोले यांनी भाजपाविरोधात आक्रमकपणे भूमिका मांडण्यास सुरूवात केली असून, काँग्रेसला बळकटी देण्यावर अधिक भर राहणार असल्याचं त्यांनी नियुक्तीनंतर माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं. त्यामुळेही या भेटीची चर्चा रंगली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2021 1:49 pm

Web Title: political buzz meeting between nana patole and bjp mp udayanraje bhonsle outside sonia gandhis residence bmh 90
Next Stories
1 मी आंदोलनजीवी अन् त्याचा मला अभिमान – पी. चिदंबरम
2 दुर्दैवी! पाकिस्तानात १८ वर्षे तुरूंगवास भोगल्यानंतर औरंगाबादला परतली, पण १५ दिवसांतच मृत्यूनं गाठलं
3 INS Viraatचे सुटे भाग करण्यास सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
Just Now!
X