24 September 2020

News Flash

क्रिकेट मॅचचा व्हिडीओ पोस्ट करत प्रियंका गांधी यांचा मोदी सरकारवर निशाणा

मोदी सरकारवर प्रियंका गांधी यांनी याआधीही टीका केली आहे

संग्रहित छायाचित्र

एका क्रिकेट मॅचमधील कॅचचा व्हिडिओ पोस्ट करुन काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. जेव्हा क्रिकेट या खेळात कॅच पकडायचा असतो तेव्हा चेंडूवर नजर आणि खेळ खेळण्याची सच्ची भावना मनात असणं गरजेचं आहे. कॅच सुटला म्हणून गणित, गुरुत्वाकर्षण, ओला-उबर अशी कारणं द्यायची नसतात. असं म्हणत प्रियंका गांधी यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे. तसंच भारतीय अर्थव्यवस्थेसाठी जनहितार्थ जारी असंही त्यांनी या ट्विट सोबत लिहिलं आहे.

याआधीही प्रियंका गांधी यांनी फोटो ट्विट करुन मोदी सरकारवर आर्थिक मंदीवरुन निशाणा साधला होता. भारतीय अर्थव्यवस्था मंदी फेऱ्यात अडकत चालली असून, देशाचा जीडीपी (विकास दर) पाच टक्क्यांवर आला आहे. अर्थव्यवस्थेवर ओढवलेल्या आर्थिक संकटावरून काही दिवसांपूर्वी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनीही सरकारवर टीका केली होती. “सरकारच्या चुकीमुळे अर्थव्यवस्था ढासळत चालली आहे. सरकारने घेतलेल्या नोटाबंदी आणि जीएसटीच्या निर्णयामुळे भारतीय अर्थव्यवस्थेची ही अवस्था झाली आहे”, अशी टीका करत “यातून अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी सरकारने तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा”, असे आवाहन सिंग यांनी केले होते.

अर्थव्यवस्थेची होत असलेली घसरण आणि वाहन उद्योगावर आलेल्या आर्थिक अरिष्टावरून काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारला सुनावले आहे. “लाखो भारतीयांच्या रोजगारावर टांगती तलवार आली आहे. सरकार डोळे कधी उघडणार?”, असा सवाल प्रियंका गांधी यांनी सरकारला केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2019 9:24 pm

Web Title: priyanka gandhi tweets against modi government regarding downfall of economy scj 81
Next Stories
1 काश्मीरचा राजदूत म्हणून जगासमोर जाईन-इम्रान खान
2 येत्या काळात पाकिस्तान जगाच्या नकाशावर राहणार नाही – आरएसएस
3 भारतीय अर्थव्यवस्थेची कामगिरी सुमार, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा मोदी सरकारला दणका
Just Now!
X