काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी द वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या वृत्तांताचा हवाला देत भारतातील फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅप भाजपा आणि आरएसएसच्या नियंत्रणात असल्याचं म्हटलं होतं. यावरून त्यांनी केंद्र सरकारवर टीका देखील केली. त्यानंतर देशात आता नवं राजकीय वादंग सुरू झाल्याचं दिसत आहे. राहुल गांधी यांनी भाजपावर केलेल्या टीकेला भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी उत्तर दिले आहे.

“राहुल गांधी हे एक अयशस्वी नेता आहेत आणि स्वाभाविकपणे कुठे न कुठे त्यांची चिडचिड व संताप दिसत आहे. राहुल गांधींना काँग्रेस पक्षावर नियंत्रण ठेवणं जमत नाही, काँग्रेस पक्ष नियंत्रणा बाहेर जात आहे आणि त्याचं नेतृत्व अपयशी ठरलेले राहुल गांधी करत आहेत.” असं संबित पात्रा यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- “काँग्रेसचे नेतृत्व निवडण्यासाठी पक्षांतर्गत निवडणूक घ्यावी; १०० नाराज नेत्यांनी सोनियांना पाठवलेलं पत्र”

राहुल गांधी यांनी रविवारी म्हटले होते की, “भारतात फेसबुक व व्हॉट्सअ‍ॅप भाजपा व आरएसएसच्या नियंत्रणाखाली आहे. त्यांनी या माध्यमातून खोट्या बातम्या आणि द्वेष पसरवला आहे. मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी याचा उपयोग केला आहे. शेवटी अमेरिकन माध्यमाने फेसबुकविषयीचं सत्य उघड केलं आहे,”.

आणखी वाचा- “भाजपा आमच्या समाजाचा शत्रू नाही हे सिद्ध करण्यासाठी…”, म्हणत शाहीन बाग आंदोलनातील नेत्याचा भाजापात प्रवेश

या अगोदर पूर्व लडाखमध्ये चीनसोबत सुरू असलेल्या सीमावादावरून राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. राहुल गांधी यांनी देशाच्या लष्कराविषयी विश्वास व्यक्त करत मोदींच्या भ्याडपणामुळे चीननं भारताची जमीन घेतल्याचा आरोप केला होता.

आणखी वाचा- “RSS मध्ये असूनही अटल बिहारी वाजपेयी नेहरुवादी होते”

“प्रत्येकाला भारतीय लष्कराच्या क्षमता आणि शौर्यावर विश्वास आहे. फक्त पंतप्रधानांना वगळून. ज्यांच्या भ्याडपणानं चीनला आमची जमीन घेण्याची परवानगी दिली. ज्यांच्या खोटेपणामुळे हे निश्चित होईल की ते हे कायम ठेवतील,” असं ट्विट् करत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता.