News Flash

पेरियार यांच्याविषयी केलेल्या विधानावरून रजनीकांत यांच्याविरोधात संताप

रजनीकांत यांच्याविरोधात गुन्हादेखील दाखल झाला आहे

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी ई.व्ही. रामास्वामी पेरियार यांच्या एका रॅलीविषयी केलेल्या विधानावरून तामिळनाडूमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. “१९७१ मध्ये रामास्वामी पेरियार यांनी सलेममध्ये रॅली काढली होती. त्या रॅलीमध्ये राम आणि सीता यांचे वस्त्रहीन फोटो लावण्यात आले होते,” असं रजनीकांत म्हणाले होते. यावरून त्यांच्याविरोधात संताप व्यक्त होत असून, एक गुन्हाही दाखल झाला आहे.

मागील आठवड्यात तुघलक या तामिळ मासिकाला रजनीकांत यांनी मुलाखत दिली होती. या मुलाखतीत बोलताना रजनीकांत यांनी ई. व्ही. रामास्वामी पेरियार यांच्या एका रॅलीविषयी वक्तव्य केलं होतं. “१९७१ मध्ये रामास्वामी पेरियार यांनी सलेममध्ये रॅली काढली होती. त्या रॅलीमध्ये राम आणि सीता यांचे वस्त्रहीन फोटो लावण्यात आले होते,” असं रजनीकांत यांनी सांगितलं. त्याच्या या विधानावर द्रविड विधुतलाई कळगम या संघटनेनं आक्षेप घेत निदर्शन सुरू केले आहे. हे कार्यकर्ते रजनीकांत यांच्या घरासमोर आंदोलन करत असून, या प्रकरणात रजनीकांत यांच्याविरोधात गुन्हाही दाखल झाला आहे.

मी माफी मागणार नाही-
त्या विधानाविषयी माफी मागण्याची मागणी होत असताना रजनीकांत यांनी नकार दिला आहे. पेरियार यांच्याविषयी मी जे वक्तव्य केलं आहे, ते अगदी खरं आहे. अनेक माध्यमांमध्ये ते प्रकाशित झालं आहे. त्यामुळे मी माफी मागणार नाही”, अशी भूमिका रजनीकांत यांनी घेतली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 21, 2020 2:08 pm

Web Title: rajinikanth refuses to apologize in periyar case said objectionable picture of ram sita was seen in the 1971 rally ssj 93
Next Stories
1 पाकिस्तानात गव्हाच्या पीठाची तीव्र टंचाई, पोळी, नान नसल्याने भूक भागेना
2 नेपाळच्या हॉटेलमध्ये आठ भारतीय पर्यटक सापडले मृतावस्थेत
3 #CAA: आंदोलनात अखिलेश यादव यांच्या मुलीची उपस्थिती, फोटो व्हायरल; वॉकला गेली होती असा पक्षाचा दावा
Just Now!
X