News Flash

VIDEO: श्रीहरीकोटा येथून प्रायोगिक स्पेस शटलची यशस्वी चाचणी

अकरा टनांचा हा अग्निबाण सोमवारी यशस्वीरित्या अवकाशात झेपावला.

एक्सपिरिमेंटल रियुजेबल लाँच व्हेईकल असे या प्रक्षेपकाचे नाव असून अवकाश क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा खर्च कमी करण्याचा त्यात उद्देश आहे.

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडून (इस्रो) श्रीहरीकोटा येथून सोमवारी सकाळी फेरवापराच्या अंतराळयानाची म्हणजेच स्पेस शटलची यशस्वी चाचणी घेण्यात आली. अकरा टनांचा हे अंतराळयान सोमवारी यशस्वीरित्या अवकाशात झेपावले. इस्रोचे अध्यक्ष किरणकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक्सपिरिमेंटल रियुजेबल लाँच व्हेईकल असे या प्रक्षेपकाचे नाव असून अवकाश क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा खर्च कमी करण्याचा त्याचा उद्देश आहे. या स्पेस शटलमुळे अवकाशात उपग्रह सोडण्याचा खर्च दहापटींने कमी होणार आहे. आरएलव्ही म्हणजे इंडियन स्पेस शटल. यात प्रक्षेपणाचा खर्च कमी आहे, त्यात हेक्स ०१ तंत्रज्ञानाचा प्रयोग प्रथम केला गेला. पंख असलेले अवकाशयान असे या स्पेस शटलचे वर्णन करता येईल व ते अवकाशात जाऊन परत येऊ शकणार आहे. घन इंधनाच्या रॉकेट मोटारवर ते चालविण्यात आले आहे. प्रत्यक्षात स्पेस शटल तयार होण्यास अजून बराच कालावधी लागेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2016 8:16 am

Web Title: rlv td india first reusable space shuttle launched from sriharikota
Next Stories
1 तालिबानी नेता मुल्ला मन्सूर ठार
2 श्रीहरीकोटा येथून आज प्रायोगिक स्पेस शटलची चाचणी
3 पंतप्रधान मोदी यांच्या इराण दौऱ्यात गुंतवणूक, ऊर्जा क्षेत्रांवर भर
Just Now!
X