करोना व्हायरसच्या रुग्णावर उपचार करताना, त्यांची काळजी घेताना कुठल्याही आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास, त्याच्या कुटुंबाला एक कोटी रुपयाची आर्थिक मदत देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. हा त्या आरोग्य कर्मचाऱ्याच्या सेवेचा आदर असेल असे केजरीवाल म्हणाले.

“Covid-19 च्या रुग्णांची काळजी घेताना सफाई कर्मचारी, डॉक्टर किंवा नर्स कोणाचाही मृत्यू झाल्यास त्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला एक कोटी रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल” असे केजरीवाल म्हणाले. खासगी किंवा सरकारी सेवेतील कर्मचारी असो, त्यांना ही मदत केली जाईल असे केजरीवाल म्हणाले.

आणखी वाचा- कॅन्सर हॉस्पिटलमधील डॉक्टरला करोनाची लागण, संपूर्ण रुग्णालय बंद करण्याची वेळ

करोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर, नर्सेस, तंत्रज्ञ आणि अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांना ५० लाखांचे आरोग्य विम्याचे संरक्षण देण्यात आले आहे असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी जाहीर केले होते. त्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी आज ही घोषणा केली.