News Flash

लेफ्टनंट जनरल सुहाग यांच्याविरोधातील याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

लेफ्टनंट जनरल दलबीर सिंह सुहाग यांच्या लष्करप्रमुख म्हणून होणाऱया नियुक्तीस आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

| July 7, 2014 01:37 am

लेफ्टनंट जनरल दलबीर सिंह सुहाग यांच्या लष्करप्रमुख म्हणून होणाऱया नियुक्तीस आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
लेफ्टनंट जनरल रवी दास्ताने यांनी ही याचिका दाखल केली होती. सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश टी.एस.ठाकूर यांच्या खंडपीठाने रवी दास्ताने यांची याचिका फेटाळून लावली त्याचबरोबर अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनीही दास्ताने यांच्या याचिकेला विरोध दर्शविला.
दलबीर सिंग सुहाग हे सध्या उपलष्करप्रमुख असून लेफ्टनंट जनरल पदाच्या अधिकाऱयांमध्ये ते सर्वांत वरिष्ठ आहेत. सध्याचे लष्करप्रमुख बिक्रम सिंग यांच्याकडून सुहाग हे ३१ जुलै रोजी लष्करप्रमुख पदाची सुत्रे स्वीकारणार आहेत. सुहाग यांच्या नियुक्तीबाबत पक्षपातीपणा झाला असल्याचा आरोप दास्ताने यांनी याचिकेतून केला होता. न्यायालयाने मात्र दास्ताने यांचा आरोप फेटाळून लावला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2014 1:37 am

Web Title: sc refuses to stall appointment of lt gen suhag as next army chief
टॅग : Army Chief
Next Stories
1 हरियाणातील पुरुषांच्या लग्नासाठी आता बिहारी मुली
2 शरत चंदर यांची ‘पीएमओ’च्या माहिती अधिकारपदी नियुक्ती
3 केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विशेष वाहिनीची घोषणा
Just Now!
X