स्कायमेटचा नवा अंदाज, जास्त पावसाची ९२ टक्के शक्यता; पाणीसंकट टळणार !!

पावसावर वाईट परिणाम करीत, सगळ्यांच्या छातीत धडकी भरवणारा एल-निनो परिणाम ओसरला असून यंदा सरासरी पातळीपेक्षा जास्त पाऊस पडेल, असा अंदाज स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने दिला आहे. देशात १०९ टक्के (कमी-अधिक ४ टक्के) पाऊस होईल, तसेच दीर्घकालीन पावसाचा विचार करता जून ते सप्टेंबर दरम्यानच्या ८८७ मि.मी. सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल, असे सांगण्यात आले. जून ते जुलै दरम्यान मान्सूनचा पाऊस दीर्घकालीन सरासरीच्या ८७ ते १०८ टक्के तर ऑगस्ट व सप्टेंबर या काळात ११३ ते १२३ टक्के राहील, असे अंदाजात म्हटले आहे. सरासरी इतका किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता ९२ टक्के असून मध्य भारत व पश्चिम किनारपट्टीत चांगला पाऊस होईल.

meteor showers, sky, meteor,
उद्यापासून आकाशात उल्कावर्षावाचा विविधरंगी नजारा, सुमारे १२ हजार वर्षांनी…
400 lakh crore market cap milestone of Mumbai Stock Exchange
विश्लेषण : ७५ हजारांचे शिखर… ४०० लाख कोटींचे बाजारभांडवल… शेअर बाजार आणखी किती तेजी दाखवणार?
glacier outburst uttarakhand
केदारनाथमध्ये पुन्हा प्रलय येऊ शकतो का? हिमनदी तलावफुटीच्या दुर्घटनांमध्ये होतेय वाढ; कारण काय?
Increase in average life expectancy of Indians
भारतीयांच्या सरासरी आयुर्मानात वाढ

गेल्या दोन वर्षांत दुष्काळ पडला असून स्कायमेट व हवामान विभाग यांचे अंदाज वेगळे होते. २०१४ मध्ये स्कायमेटने दुष्काळ पडेल, तर हवामान विभागाने पाऊस चांगला होईल, असा अंदाज दिला होता. गेल्या वर्षी स्कायमेटने मान्सूनचा पाऊस चांगला होईल, असे म्हटले होते तर हवामान विभागाने दुष्काळाचे भाकीत केले होते. या वर्षी स्कायमेट व हवामान विभाग दोघांनीही सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज दिला आहे.

स्कायमेटच्या अंदाजानुसार दीर्घकालीन विचार करता मोसमी पाऊस सरासरीपेक्षा खूप जास्त होण्याची शक्यता (११० टक्क्यांपेक्षा अधिक) २५ टक्के आहे. सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता (१०५ ते ११० टक्के) ३७ टक्के आहे. सरासरीइतका पाऊस होण्याची शक्यता (९६ ते १४० टक्के) ३० टक्के तर सरासरीपेक्षा कमी पावसाची (९० ते ९५ टक्के) ५ टक्के इतकी आहे. दुष्काळ म्हणजे नेहमीच्या सरासरीच्या ९० टक्क्यांपेक्षा कमी पावसाची शक्यता ३ टक्के आहे. स्कायमेटने म्हटल्यानुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत खरिपाच्या धान्य पेरणी क्षेत्रात १५ ते २० टक्के वाढ अपेक्षित आहे.

यंदा खरिपाचे उत्पादन १२९ ते १३० दशलक्ष टन राहील. या वेळी तेलबिया म्हणजे सोयाबिन, शेंगदाणा, डाळी (तूर, मूग, उडीद) व तांदळाचे क्षेत्र वाढेल. कापसाखालील क्षेत्र मात्र कमी होण्याची शक्यता आहे. उसाच्या लागवडीचे क्षेत्र तेवढेच म्हणजे गेल्या वर्षीइतके राहील.

ला निना परिणाम

यंदाच्या वर्षी ला निना हा मान्सूनला अनुकूल मानलेला परिणाम सुरू होत आहे. स्कायमेटचे उपाध्यक्ष (हवामान) जी.पी.शर्मा यांनी सीएनबीसी टीव्ही १८ वाहिनीला सांगितले, की एल निनो परिणाम ओसरत चालला आहे. तो यंदाच्या वर्षी राहणार नाही. गेल्या दोन वर्षांत एल निनोनेच घात केला होता. आता एल निनो बहुतांश ओसरला आहे, पॅसिफिकचे पाणी आता थंड होत आले आहे. सागरी हवामानाची माहिती विचारात घेता मान्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा अधिक होईल. पॅसिफिकचे पाणी थंड झाल्याने आपण ला निनाकडे मार्गक्रमण करीत आहोत. जूनपर्यंत मान्सून राजस्थान वगळता देशाच्या सर्व भागांत पसरलेला असेल.
monsoon-chart

कुठे, किती?

बिहार, पूर्व उत्तर प्रदेशात फार पाऊस होणार नाही. तामिळनाडू, ईशान्य भारत व दक्षिण कर्नाटकात चारही महिन्यात पावसाची मध्यम स्वरूपाची जोखीम आहे. महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या काही भागात खूप जास्त पावसाची शक्यता असून मान्सूनच्या पहिल्या टप्प्यापेक्षा दुसऱ्या टप्प्यात जास्त पाऊस अपेक्षित आहे, रोणू वादळामुळे मान्सून अंदमानात वेळेपूर्वी आला व तो पुढे जात आहे. तो केरळात स्थिर होण्यास स्थिती अनुकूल आहे, असे स्कायमेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी जतिन सिंह यांनी सांगितले.