News Flash

दक्षिण भारतात आढळलेला करोना विषाणू सर्वाधिक घातक; मृत्यूचा धोका १५ पटींनी वाढला

नव्या करोना विषाणूमुळे चिंतेत भर

देशात करोना रुग्ण झपाट्याने वाढत असताना आता दक्षिण भारतात आढळलेल्या करोना विषाणूमुळे चिंतेत भर पडली आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेत या विषाणूच्या तीव्रतेमुळे चिंतेत वाढ झाली आहे. हा करोना व्हेरियंट आंध्र प्रदेशमध्ये आढळून आला आहे. या विषाणूला N44OK असं शास्त्रीय नाव देण्यात आलं आहे. या विषाणूची तीव्रता १५ पटीने अधिक असल्याचं सेंटर फॉर सेल्यूलर अँड मॉलिक्यूलर बायोलॉजीलतील शास्त्रज्ञांनी सांगितलं. या विषाणूमुळे ३ ते ४ दिवसात रुग्ण बाधित होतो.

N44OK हा करोनाचा विषाणू B.1.617 आणि B.1.618 व्हेरियंटपेक्षा अधिक घातक असल्याच दिसून आलं आहे. हा विषाणू रुग्णांना लगेच आपल्या कवेत घेत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे भविष्यात रुग्णसंख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तसेच ३ ते ४ दिवसातच रुग्णाची स्थिती खालावत असल्याने चिंता वाढली आहे. हा व्हायरस तरुणांमध्ये मोठ्या संख्येने पसरत आहे. त्याचबरोबर व्यायाम आणि रोग प्रतिकारशक्ती अधिक असलेल्या लोकांवरही भारी पडत आहे.

“नाईट कर्फ्यू, वीकेंड लॉकडाउन निरपयोगी; कडक लॉकडाउनच हवा”

दक्षिण भारतात N44OK हा व्हायरस आपले पाय पसरत आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगाणामध्ये याचे रुग्ण आढळून आले आहेत. सध्या दक्षिण भारतात B.1, B.1.1.7, B.1.351,B.1.617 आणि B.1.36 (N44OK) या व्हेरियंटने बाधित रुग्ण आढळत आहेत.

“मागणी वाढतेय, राज्याला २०० मेट्रिक टन जादा ऑक्सिजन द्या”, महाराष्ट्राचं केंद्र सरकारला पत्र!

देशात B.1.1.7 या व्हेरियंटची सर्वाधिक नागरिकांना करोनाची बाधा झाली आहे. मात्र आता समोर आलेला विषाणू सर्वाधिक घातक असल्याचं अभ्यासातून समोर आलं आहे. त्यामुळे भविष्यात आणखी काळजी घेणं गरजेचं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 4, 2021 5:52 pm

Web Title: south india corona virus strain 15 times more intensity rmt 84
टॅग : Corona,Coronavirus
Next Stories
1 “पंतप्रधानांच्या घरावर १३ हजार कोटी खर्च करण्यापेक्षा केंद्राने…!” प्रियांका गांधींनी केंद्र सरकारला सुनावले!
2 करोनाशी लढण्यासाठी भारताला सॅमसंग कंपनीकडून ३७ कोटींची मदत
3 करोनाच्या तावडीत जंगलाचा राजाही सापडला; हैद्राबादमधल्या ८ सिंहांना करोनाची लागण!
Just Now!
X