जेजु या पर्यटक बेटावर शालेय सफरीसाठी निघालेली एक बहुमजली बोट दक्षिण कोरियाच्या दक्षिणेकडील समुद्रात बुडून तिघांचा अंत ओढवला तर ५५ जण जखमी झाले. ३०० जणांचा शोध सुरू आहे. या बोटीवर ४५९ प्रवासी होते, त्यात ३२४ विद्यार्थी आणि १४ शिक्षकांचा समावेश आहे. किनारा सोडल्यानंतर दोन तासांत ब्योंगपुंग बेटापासून २० किमी अंतरावर ६,८२५ टन वजनाची ही अवाढव्य बोट एका बाजूला कलंडली. मदतीसाठी प्रथम लहान नौका आणि बोटी धावल्या. त्या नौकांपर्यंत पोहोचण्यासाठी जिवाच्या आकांतानं अनेकांची धडपड सुरू होती. काही काळात नौदलाच्या नौका आणि हेलिकॉप्टर थडकताच लोकांना सुखरूप किनाऱ्यावर आणण्यास वेग आला. नौदलाच्या पाणबुडय़ांनी खोल समुद्रातही शोध जारी ठेवला आहे. मृतांमध्ये एका विद्यार्थ्यांचा तसेच एका महिला कर्मचाऱ्याचा समावेश आहे.