देशांतर्गत विमान सेवेतील आघाडीची कंपनी स्पाईसजेटने एक लाख तिकीटे स्वस्तात उपलब्ध करून दिली आहेत. एकमार्गी प्रवासासाठी कंपनीने सर्वात स्वस्त तिकीट ७९९ रुपयांमध्ये (कर वगळून) उपलब्ध केले आहे. ‘फ्रिडम टू फ्लाय’ सेलच्या माध्यमातून ही स्वस्तातील तिकीटे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
२० ते २२ ऑगस्ट या दरम्यान आगाऊ आरक्षण करणाऱया प्रवाशांनाच या स्वस्तातील तिकीटांचा लाभ घेता येईल. २५ ऑगस्ट २०१५ ते २६ मार्च २०१६ या कालावधीमध्ये प्रवाशांना या तिकीटांच्या साह्याने स्पाईसजेटच्या विमानांमधून देशांतर्गत स्वस्तात फिरता येईल. प्रवाशांनी स्पाईसजेटच्या अधिकृत संकेतस्थळावरून आरक्षण केल्यासच त्यांना या सवलतीचा फायदा घेता येईल. या सेलच्या माध्यमातून काढलेल्या तिकीटांचा परतावा देण्यात येणार नाही, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 20, 2015 1:11 am