News Flash

“काही लोकांच्या सांगण्यावरुन रिया चक्रवर्तीची हत्या केली जाऊ शकते”

"रियाने पोलीस संरक्षण घ्यायला हवं. कारण..."

“काही लोकांच्या सांगण्यावरुन रिया चक्रवर्तीची हत्या केली जाऊ शकते”

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणामध्ये आता बिहारमधील सत्ताधारी पक्ष असणारा जनता दल यूनायटेडने उघडपणे मतप्रदर्शन करत आपली भूमिका मांडली आहे. जेडीयूच्या प्रवक्त्यांनी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा दिशा सालियनच्या ‘हत्ये’शी संबंध असल्याचे दिसत आहे असं म्हटलं आहे. तसेच हे सारं घडवून आणणारे लोकं स्वत:ला वाचवण्यासाठी रिया चक्रवर्तीची हत्याही करु शकतात अशी शक्यताही जेडीयूच्या प्रवक्त्यांनी व्यक्त केली आहे. पक्षाचे प्रवक्ते राजीव रंजन यांनी या संदर्भातील मत मांडले आहे.

दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूत दोघांच्या मृत्यूचा काहीतरी संबंध असल्याची शक्यता रंजन यांनी व्यक्त केली आहे. “मुंबई पोलिसांनी दिशा सालियनच्या आत्महत्याप्रकरण आटोपतं घेतलं आहे. तर दुसरीकडे ते आता सुशांत सिंह प्रकरणामध्येही ते योग्यपणे चौकशी करत नसल्याचे दिसून येत आहे. ४५ दिवसांनंतरही या प्रकरणामधील बराचसा तपशील पोलिसांनी गोळा केलेला नाही हे ही लक्षात घ्यायला हवं,” असं रंजन म्हणाले. पक्षाने आपली भूमिका मांडणारा एक व्हिडिओ जारी केला आहे त्यामध्येच रंजन या प्रकरणाबद्दल बोलताना दिसत आहेत.

“दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणामध्ये एक समान धागा आहे तो म्हणजे रिया चक्रवर्ती. काही महत्वाच्या लोकांच्या सांगण्यावरुन रिया चक्रवर्तीची हत्याही केली जाऊ शकते. रियाने पोलीस संरक्षण घ्यायला हवं, कारण रिया या प्रकरणामध्ये संक्षयित आहे आणि मुख्य साक्षीदारही आहे. तिने न्यायालयाकडे स्वत:च्या सुरक्षेसाठी तिने मागणी करायला हवी,” असंही रंजन म्हणाले आहेत. या प्रकरणाकडे तुकड्या तुकड्यांमध्ये न बघता तपास यंत्रणांनी याचा एकत्रितपणे तपास करावा अशी मागणीही रंजन यांनी केली आहे.

मुंबई पोलिसांच्या कामाच्या पद्धतीवर रंजन यांनी नाराजी व्यक्त केली आहे. न्याय देण्याच्या विचारानुसार या प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांनी काम केलं पाहिजे असं रंजन म्हणाले आहेत. “मुंबई पोलिसांनी बिहार पोलिसांना या प्रकरणाशी संबंधित सर्व पुरावे सुपूर्द करावे. या प्रकरणाचा पुढील तपास बिहार पोलिसांनी करावा,” अशी मागणी रंजन यांनी केली आहे. या प्रकरणामध्ये सुशांतच्या वडीलांनी तक्रार दाखल केल्यानंतर बिहार पोलिसांची एक तुकडी तपासासाठी मुंबईत आली आहे. तेव्हापासूनच मुंबई पोलीस आणि बिहार पोलिसांमध्ये वाद दिसून येत आहे. मुंबई पोलीस आम्हाला तपासासाठी सहकार्य करत नसल्याची तक्रार बिहार पोलिसांनी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2020 7:50 am

Web Title: sushant singh rajput case jdu claims rhea chakraborty may additionally be murdered scsg 91
Next Stories
1 ऑक्सफर्ड लशीच्या चाचण्यांसाठी सिरम इन्स्टिटय़ूटला परवानगी
2 न्यायालयाचा अवमान नाही – प्रशांत भूषण
3 अयोध्या सज्ज
Just Now!
X