दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलिगी मर्कझमध्ये धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला एकूण आठ हजार लोक या कार्यक्रमास उपस्थित होते. यात भारताच्या विविध भागातून त्याचबरोबर इतर देशातूनही लोक आले होते. यामध्ये २५ जणांना करोनाची लागण झाल्याच समोर आल्यानंतर टीका होऊ लागली आहे. केंद्र सरकारनंही यावर टीका केली असून, गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवानी यांनी त्याला उत्तर दिलं आहे.

दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलिगी मर्कझमध्ये धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. एकूण आठ हजार लोक या कार्यक्रमास उपस्थित होते. त्यांच्यातील अनेकांमध्ये करोनाची लक्षणे दिसली आहेत. या कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्यांपैकी ३० जण करोना बाधित असल्याचे चाचण्यांत स्पष्ट झाले आहे. त्यातील तीन जणांचा काही दिवसांत मृत्यू झाला. त्यानंतर ही जागा रिकामी करण्यात आली असून, या कार्यक्रमात सहभागी झालेल्या व्यक्तींचा शोध घेण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. या सगळ्या प्रकारावर विविध माध्यमातून टीकेचा सूर उमटल्यानंतर केंद्र सरकारनंही तिखट शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली.

आणखी वाचा- तबलिगी मर्कझ: मोदी सरकारमधील नेते मुख्तार अब्बास नकवी म्हणतात, ” हा तर तालिबानी गुन्हा, यांना…”

गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवानी यांनी तबलिगी मर्कझ’वरून होत असलेल्या टीकेला ट्विट करून उत्तर दिलं आहे. “गुजरात मॉडेल कामाला लागलं आहे. जे सरकार कोट्यवधी हिंदू देशवासियांना आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या मूलभुत सविधा देऊ शकले नाही. ज्यांच्याकडे कोट्यवधी हिंदूची तपासणी करण्यासाठी किट नाही. ते सरकार तबलिगी मर्कझ’वर खापर फोडून संकटाच्या प्रसंगालाही धर्माचा रंग देण्याचा प्रयत्न करीत आहे. लाज वाटली पाहिजे,” अशा शब्दात मेवानी यांनी टीका केली आहे.

आणखी वाचा- काही कट्टरपंथी मुस्लिमांकडूनच मोदींच्या लॉकडाउनला विरोध : वसीम रिझवी

इंडोनेशियाचे आठ जण ताब्यात

‘तबलिगी मर्कझ’मध्ये सहभागी झालेले आठ इंडोनेशियन मुस्लीम धर्मप्रसारक हे उत्तर प्रदेशातील बिजनौर येथील मशिदीत सापडले आहेत. नागिना भागातील या मशिदीतून त्यांना ताब्यात घेतले. बिजनौरचे पोलिस अधीक्षक संजय सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी इंडोनेशियाच्या आठ धर्मप्रसारकांना ताब्यात घेतले असून ते १३ मार्च रोजी निझामुद्दीन येथील ‘तबलिगी मर्कझ’मध्ये सहभागी झाले होते. सर्व आठ जणांना विलगीकरण केंद्रात पाठवले असून त्यांची चौकशी चालू आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहिल्यानंतर ते ओडिशाला गेले व नंतर तेथून बिजनौरला आले. ते ओडिशात नेमके कुठे गेले होते याची माहिती घेण्यात येत आहे. मशिदीच्या पाच जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.