मध्य प्रदेशामधील एका चहा विक्रेत्याची मुलगी भारतीय हवाई दलामध्ये लढाऊ पायलट बनण्यास सज्ज झाली आहे. मध्य प्रदेशातील प्रशासकीय परीक्षा पार करणारी आंचल गंगवाल ही एकमेव मुलगी असून ती आता फायटर पायलट म्हणून एअरफोर्समध्ये दाखल होणार आहे.
“मी जेव्हा बारावीत होते त्यावेळी उत्तराखंडमध्ये पूराची दुर्दैवी घटना घडली होती. त्यावेळी हवाई दलांनी जे बचावकार्य केलं त्यामुळे मी अत्यंत प्रभावित झाले आणि त्याचवेळी हवाई दलामध्ये जाण्याचा मी निश्चय केला,” आंचलने एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही ट्विटरच्या माध्यमातून आंचलचं अभिनंदन केलं आहे. तिचा निश्चय आणि प्रयत्न कौतुकास्पद असल्याचं चौहान म्हणाले. “नवीन मार्ग चोखाळण्यासाठी जिद्द व निश्चय आवश्यक असतो. मध्य प्रदेशची कन्या असलेल्या आंचल गंगवालने यश मिळवताना याची प्रचिती दिली आहे. इंडियन एअरफोर्सच्या २२ जागांसाठी सहा लाख अर्ज आले होते. त्यामध्ये आंचलने बाजी मारली आहे. अभिनंदन,” या शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांनी आंचलचे कौतुक केले आहे.