News Flash

“लसीकरणातील दिरंगाईसाठी मी देशाची माफी मागतो”, ‘या’ देशात पंतप्रधानांनीच मागितली माफी!

देशात लसीकरणात होणारी दिरंगाई आणि पुरेशा प्रमाणात लसी मिळवण्यात आलेलं अपयश याची जबाबदारी घेऊन चक्क पंतप्रधानांनीच देशाची माफी मागितली आहे.

करोना प्रतिबंधक लस (प्रातिनिधिक छायाचित्र)

जगभरात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झालेला असताना आता सर्वच देश आपल्या नागरिकांसाठी पुरेशा प्रमाणात लसींचा साठा करण्याच्या प्रयत्नात आहेत. या पार्श्वभूमीवर जगभरात उपलब्ध असलेल्या मोजक्याच प्रकारच्या लसींच्या उत्पादकांवर अतिरिक्त मागणी आणि पुरवठ्याचा ताण येऊ लागला आहे. त्यामुळे अनेक देशांमध्ये अत्यांत कमी प्रमाणात लसी पोहोचल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आहेत त्या लसींचंच योग्य नियोजन न केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर लसीकरणात दिरंगाई झाल्याबद्दल आशियातल्या एका देशाच्या पंतप्रधानांनी चक्क देशाची माफी मागितली आहे!

…आणि गोंधळाची जबाबदारी पंतप्रधानांनी घेतली

थायलंडमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये लसींचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवू लागला आहे. या देशात लसींचा पुरवठा करण्याची मुख्य जबाबदारी थायलंडच्या राजाच्या मालकीच्या एका औषध निर्मिती कंपनीवर आहे. या कंपनीच्या माध्यमातून अॅस्ट्राझेनेका लसींचा पुरवठा केला जातो. मात्र, या कंपनीच्या माध्यमातून दक्षिण-पूर्व आशियाई देशांमध्ये देखील लसींचा पुरवठा केला जातो. आणि गेल्या काही दिवसांमध्ये थायलंडलाच लसींचा पुरेशा प्रमाणात साठा मिळवण्यामध्ये अडचणी येऊ लागल्या आहेत. या सगळ्या गोंधळाची जबाबदारी देशाच्या पंतप्रधानांनी घेतली आहे. इतकंच नाही तर त्याबद्दल देशवासीयांची माफी देखील मागितली आहे.
आम्ही यापुढे काळजी घेऊ!

thiland prime minister Prayuth Chan Ocha थायलंडचे पंतप्रधान प्रयुथ चान ओका

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, थायलंडचे पंतप्रधान प्रयुथ चान-ओका यांनी या सगळ्या गोंधळाची जबाबदारी घेतली आहे. “या समस्येसाठी मी देशवासीयांची माफी मागतो. ही समस्या सोडवण्याची पूर्ण जबाबदारी मी घेतो. आम्ही या पुढच्या काळात अधिक चांगल्या पद्धतीने परिस्थिती हाताळू”, असं प्रयुथ म्हणाले आहेत.

‘या’ मास्कच्या संपर्कात येताच करोना विषाणू होतो नष्ट; पुण्यातील ‘स्टार्टअप’ला मोदी सरकारचं पाठबळ

४७ लाख लोकांना लसीचा पहिला डोस

आत्तापर्यंत थायलंडच्या जवळपास साडेसहा कोटी लोकसंख्येपैकी फक्त ४७ लाख लोकांना लसीचा किमान एक डोस तरी देण्यात आला आहे. ताज्या आकडेवारीनुसार थायलंडमधल्या सुमारे ७००० सरकारी आणि खासगी संस्था आणि कंपन्या अॅस्ट्राझेनेकाव्यतिरिक्त इतरही लसींचा साठा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर थायलंडमध्ये चीनी लस असलेल्या सिनोफार्मचे १० लाख डोस दाखल होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2021 10:05 pm

Web Title: thailand prime minister prayuth chan ocha say sorry for vaccination delay pmw 88
टॅग : Corona,Coronavirus
Next Stories
1 करोना लस घेतल्यास एक लिटर पेट्रोल मोफत! लसीकरण वाढवण्यासाठी अजब-गजब ऑफर
2 ‘उत्तर प्रदेशातील लोकांची बदनामी थांबवा’; व्हायरल व्हिडिओवरुन योगी आदित्यनाथ यांची राहुल गांधींवर टीका
3 बिहारमध्ये राजकीय भूकंप; लोकजनशक्ती पक्षात उभी फूट! ५ बंडखोर खासदारांची हकालपट्टी!
Just Now!
X