News Flash

टीएमसीचे निवडणूक आयोगाला निवेदन; मतदान केंद्रावर केवळ केंद्रीय सैन्य तैनात करण्याच्या निर्णयाला मागे घेण्याचा आग्रह

पश्चिम बंगालमध्ये पुढील महिन्यात निवडणूका होणार आहेत

(संग्रहित छायाचित्र)

तृणमूल काँग्रेस (टीएमसी) ने निवडणूक आयोगाला सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, निवडणूक आयोगाने पश्चिम बंगाल निवडणुकांसंदर्भात पक्षनिष्ठ आणि पक्षपाती पध्दतीचा अवलंब केला आहे. मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या आत केवळ केंद्रीय सैन्य तैनात करण्याचा आणि मतदान संपल्यानंतर ईव्हीएमसह व्हीव्हीपीएटी मशीन्सची पूर्णपणे पडताळणी करावी अशी विनंती देखील टीएमसीने आयोगाला केली आहे.

“पश्चिम बंगाल राज्यात स्वतंत्र, निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका दूरदूरचे वास्तव होत चालले आहे हे स्पष्ट होत आहे. हे निवडणूक आयोगाने चालू निवडणुकांच्या संदर्भात घेतलेल्या पक्षपाती पध्दतीच्या निर्णयांवरून स्पष्ट होते. राज्यात, असे टीएमसीने आयोगाला दिलेल्या निवेदनात लिहिले.

टीएमसीच्या पत्रात असे म्हटले आहे की, पश्चिम बंगालमधील मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या आत केंद्रीय सैन्य तैनात करण्याचा निर्णय आयोगाने मतदान असलेल्या अन्य राज्यांसाठी घेतला नाही.

या पत्रात म्हटले आहे की, आयोगाने केंद्रीय दलात तैनात करणे म्हणजे कायदा व सुव्यवस्थेचा सामना करण्याची घटनात्मक जबाबदारी असलेल्या राज्य सरकारच्या अधिकारांना डावलणे होय.

टीएमसीने पत्रात म्हटले आहे की, “स्वतंत्र व निष्पक्ष निवडणुका सुनिश्चित करण्यासाठी राज्य व केंद्रीय दलांमध्ये योग्य समन्वय असावा आणि राज्य आणि केंद्रीय पोलिस दलांचे एकत्रित गट मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या आत तैनात करावेत, अशी आमची मागणी आहे.”

“आम्ही आशावादी आहोत की आम्ही केलेल्या सूचनांवर तुम्ही विचार कराल आणि लोकशाहीमधील मतदारांचे हित जपण्याच्या व्यापक हितासाठी या अंमलबजावणीसाठी तुम्ही योग्य ते प्रयत्न कराल,” असे या पत्रात नमूद केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2021 5:11 pm

Web Title: tmc urges election commission to cancel decision to deploy only central forces at polling stations sbi 84
Next Stories
1 फ्रान्स : करोनाची तिसरी लाट आल्याने एक महिन्याचा लॉकडाउन जाहीर; राष्ट्राध्यक्षांवर राजकीय संकटाची टांगती तलवार
2 असदुद्दीन ओवैसींना झटका; बंगालची जबाबदारी असलेल्या नेत्याने दिला ममतांना पाठिंबा
3 “नागपुरात जन्मलेली संघटना आख्ख्या देशाला नियंत्रित करू पाहतेय”, राहुल गांधींची परखड टीका!
Just Now!
X