१. आयसिसचा म्होरक्या अबू अल बगदादी जिवंत, ५ वर्षानंतर जारी केला व्हिडिओ
आयसिस या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबू बक्र अल बगदादी याने तब्बल पाच वर्षानंतर व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओनंतर बगदादीने ऑडियो क्लिपही जारी केली असून यात त्याने श्रीलंकेतील बॉम्बस्फोटांवर भाष्य केले आहे. जुलै २०१४ नंतर बगदादी पहिल्यांदाच व्हिडिओत दिसला आहे. वाचा सविस्तर : 

२. हिमालयात हिममानव?, भारतीय सैन्याकडून पाऊलखुणांचे फोटो प्रसिद्ध
बर्फाळ प्रदेशातील हिममानवाविषयी आपण नेहमीच चर्चा ऐकतो. याविषयीच्या कथाही रंगवून सांगितल्या जातात. मात्र, आता हिमालयातील बर्फाळ प्रदेशात हिममानवाच्या पावलाचे ठसे आढळले असून भारतीय सैन्यानेच ट्विटरद्वारे हे फोटो प्रसिद्ध केले आहे. यामुळे हिममानवाच्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आले आहे. वाचा सविस्तर : 

३.‘मी गे नाही!’; सोशल मिडियावरील पोस्टवरुन गोंधळानंतर ‘या’ ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूचे स्पष्टीकरण

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू जेम्स फॉकनर काल २९ वर्षांचा झाला. आपल्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशननिमित्त पोस्ट केलेल्या फोटोवरुन फॉकनर गे असल्याची चांगलीच चर्चा सोशल नेटवर्किंगवर रंगली. फोटोच्या कॅप्शनवरुन तो गे असल्याचे नेटकऱ्यांना वाटले आणि त्याची पोस्ट व्हायलर झाली. अनेकांनी त्यांचा पाठिंबा देत त्याने दाखवलेल्या हिंमतीबद्दल त्याचे कौतुकही केलं. मात्र आज पुन्हा एकदा फॉकनरने एक पोस्ट करुन आपण गे नसल्याचे म्हटले आहे. वाचा सविस्तर : 

जेम्स फॉकनर (फाइल फोटो)

४.सांगलीत १७२ गावे, एक हजार वस्त्यांना टँकरने पाणीपुरवठा
सांगली जिल्ह्य़ात उन्हाची तीव्रता वाढेल तसा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनू लागला आहे. जिल्ह्य़ात साडेतीन लाख लोकांना तहाण भागविण्यासाठी सध्या टँकरच्या पाण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. १७२ गावे आणि १ हजार वस्तीसाठी सध्या टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी सांगितले. वाचा सविस्तर : 

(संग्रहित छायाचित्र)

५.बलात्कार प्रकरणातील दोषी आसाराम बापूवर लवकरच बायोपिक!
गेल्या काही काळापासून बॉलिवूडमध्ये बायोपिकचा ट्रेण्ड सुरु आहे. या ट्रेण्डमध्ये आतापर्यंत अनेक व्यक्तींच्या जीवनावर आधारित बायोपिकची निर्मिती करण्यात आली आहे. क्रीडापटूंपासून ते अभिनेत्यांपर्यंत अनेकांचा जीवनप्रवास या बायोपिकमधून उलगडण्यात आला. त्यातच आता बलात्कार प्रकरणी दोषी असणाऱ्या आसाराम बापूवर लवकरच बायोपिक करण्यात येणार आहे. वाचा सविस्तर

आसाराम बापू