१. दुख:द..! वडील लग्नपत्रिका वाटत असतानाच मुलगा शहीद झाल्याची बातमी आली
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला असून अद्यापही दहशतवादी कारवाया सुरु असल्याचं दिसत आहे. शनिवारी नियंत्रण रेषेवर नौसेरा सेक्टरमध्ये तपासणीदरम्यान आयईडी डिफ्यूज करताना मोठा स्फोट झाला. या स्फोटात ३१ वर्षीय मेजर चित्रेश सिंह बिष्ट शहीद झाले. मेजर चित्रेश यांचे सात मार्च रोजी लग्न होते. वाचा सविस्तर : 

२. ‘एमटीएनएल’ कर्मचाऱ्यांना मार्चनंतर वेतन नाही?
‘महानगर टेलिफोन निगम’च्या मुंबई आणि दिल्लीतील कर्मचाऱ्यांना मार्चनंतर वेतन मिळणे कठीण होणार आहे. या कर्मचाऱ्यांना जानेवारीचे वेतन अद्याप मिळालेले नाही. त्यासाठी दूरसंचार विभागाला साकडे घालण्यात आले आहे. परंतु दूरसंचार विभागाने मंजूर केलेला निधी पुरेसा नसल्याचे स्पष्ट झाले आहे. वाचा सविस्तर :

३. ‘उदय देशपांडे यांना जीवनगौरव कशासाठी?’ हा ज्येष्ठ क्रीडा पत्रकार वि. वि. करमरकर यांचा लेख शनिवारी ‘लोकसत्ता’मध्ये प्रकाशित झाला होता. या लेखाला दिलेल्या उत्तरात ‘शिवछत्रपती पुरस्काराची निवड ही सर्वस्वी निवड समितीकडून होते, निवड प्रक्रियेत शासनाचा हस्तक्षेप नसतो’ असे राज्याच्या क्रीडामंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. वाचा सविस्तर :

(संग्रहित छायाचित्र)

४. Pulwama Terror attack: लष्करी रूग्णालयातून मसूदने दिले होते हल्ल्याचे आदेश
जैश-ए-मोहम्मदचा मोहरक्या मसूद अजहरने पाकिस्तानच्या लष्करी रूग्णालयातून पुलवामा हल्ल्याचे आदेश दिले होते अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या पाच महिन्यापासून मसूद अजहर रावळपिंडीतील लष्करी रूग्णालयात उपचार घेत आहे. तेथूनच त्याने जवानांवर हल्ला करण्याचे आदेश दिल्याचे तपासात उघड झाले आहे. वाचा सविस्तर :

५. कंगाल पाकिस्तानपुढे शरणागती का?
कंगाल झालेले राष्ट्र जर सरकारला काबूत करता येत नसेल तर सरकारने राजीनामा द्यावा. कंगाल पाकिस्तानपुढे शरणागती का पत्करता, असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला. वाचा सविस्तर :