१. राजधानी दिल्लीत जैशचे दोन दहशतवादी! पोलिसांकडून अलर्ट जारी
जैश-ए-मोहम्मदचे दोन दहशतवादी दिल्लीत घुसल्याची माहिती मिळाल्यानंतर दिल्लीत सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी दोन संशयितांचे फोटो प्रसिद्ध केले आहेत. गुप्तचर यंत्रणांनी दिल्ली पोलिसांना सावध केले आहे. दिल्ली पोलिसांकडून एक अॅडव्हायजरी जारी करण्यात आली आहे. त्यात लोकांना सर्तक रहाण्यास सांगितले असून कुठल्याही संशयास्पद गोष्टी नजरेस पडल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वाचा सविस्तर :

२. धक्कादायक! २०१३ पासून मुंबईतून २,२६४ मुली बेपत्ता
मुंबईतील महिलांच्या सुरक्षिततेबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईतून महिला आणि मुलींच्या बेपत्ता होण्याचे प्रमाण चिंताजनक आहे. २०१३ सालापासून मुंबईतून २६ हजारापेक्षा जास्त मुली आणि महिला बेपत्ता झाल्या होत्या. त्यापैकी २,२६४ जणींचा अद्यापही शोध लागलेला नाही. विधानसभेमध्ये भाजपा आमदार मंगलप्रभात लोढा आणि अन्य आमदारांनी विचारलेल्या प्रश्नाला लिखित उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. वाचा सविस्तर :

३.कुठे आहेत नोकऱ्या? भरसभेत युवकाने भाजपा नेत्याला विचारला प्रश्न
मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत शेती आणि नोकऱ्या हे दोन प्रमुख मुद्दे आहेत. रविवारी अलीराजपूर जिल्ह्यात भाजपाची जनसभा सुरु असताना एका युवकाने रोजगाराच्या मुद्यावरुन भाजपा उमेदवार माधव सिंह दावर यांच्याबरोबर वाद घातला. जोबात विधानसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार माधव सिंह दावर उमदा गावात एका जनसभेला संबोधित करत असताना एक युवक समोर आला व त्याने रोजगारावरुन दावर यांना प्रश्न विचारले. वाचा सविस्तर :

४. भारत, रशियामध्ये ५०० दशलक्ष डॉलरचा युद्धनौकाबांधणी करार
भारत आणि रशिया यांच्यात मंगळवारी दोन युद्धनौकाबांधणीसाठी ५०० दशलक्ष डॉलरचा करार करण्यात आला. या नौकांची बांधणी गोवा येथील नौदल गोदीत करण्यात येणार आहे. तसेच रशिया त्यांच्या बांधणीचे तंत्रज्ञानही भारताला हस्तांतरित करणार आहे. वाचा सविस्तर :

५. मुस्लिमांच्या आरक्षणासाठी शिवसेना आग्रही

मराठा आरक्षणावरून काँग्रेसच्या भूमिकेशी राष्ट्रवादीने आणि भाजपच्या भूमिकेशी शिवसेनेने विसंगत भूमिका घेतल्याने आघाडी आणि युतीतील विसंवाद उघड झाला आहे. वाचा सविस्तर :