News Flash

ट्विटरच्या ‘सीईओ’पदाच्या शर्यतीत भारतीय महिला

ट्विटरच्या सीईओपदी आंध्र प्रदेशातील पद्मश्री वॉरियर यांची निवड होण्याची शक्यता

ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी(सीईओ) डिक कॅस्टोलो यांनी राजीनामा दिल्यानंतर ट्विटर नव्या सीईओच्या शोधात आहे. समाजमाध्यमांमध्ये अत्यंत लोकप्रीय असलेल्या ट्विटरच्या सीईओपदासाठी अनेक जण शर्यतीत आहेत. यात एका भारतीय महिलेचा देखील समावेश आहे. ट्विटरच्या सीईओपदी आंध्र प्रदेशातील पद्मश्री वॉरियर यांची निवड होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

पद्मश्री वॉरियर या मूळच्या आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील आहेत. दिल्लीतील आयआयटीमधून केमिकल इंजिनिअरिंगची पदवी मिळवल्यानंतर त्यांनी अमेरिकेत कॉर्नेल विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. न्यूयॉर्कच्या पॉलिटेक्निक विद्यापीठाने त्यांनी डी.लिट. देखील प्रदान केली आहे. त्या सध्या सीस्को सिस्टीमच्या सीईओ म्हणून कार्यरत आहेत.

पद्मश्री वॉरियर यांच्यासह सीबीएस इंटरअॅक्टिव्हचे जीम लॅन्झोन यांचाही ट्विटरच्या सीईओ पदासाठी विचार केला जात आहे. तर जॅक डोर्सी हे सध्या ट्विटरच्या सीईओपदाचा अतिरिक्त कारभार सांभाळत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2015 6:28 pm

Web Title: twitter ceo hunt indian padmasree warrior joins race
टॅग : Twitter
Next Stories
1 ‘इसिस’मध्ये सामील होण्यास निघालेल्या ११ भारतीयांना अटक
2 आघाडीमध्ये निवडणूक लढवूनही भाजपला बिहारमध्ये स्वबळाची आस, १६० जागांवर ठाम
3 औरंगजेब रस्त्याच्या नामांतरवरून दिल्ली हायकोर्टाचे केंद्राला माहिती देण्याचे आदेश
Just Now!
X