ट्विटर या सोशल नेटवर्किंग वेबसाइटने आपल्या सगळ्या युजर्सना पासवर्ड त्वरित बदलण्यासंदर्भातले प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे. स्टोअर्ड पासवर्डच्या इंटरनल लॉगमध्ये बग आढळल्याने ट्विटरने हे प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे. आम्हाला इंटरनल लॉगमध्ये बग आढळल्याने आम्ही आमच्या युजर्सना पासवर्ड त्वरित बदलण्याचे आवाहन करतो आहोत. आम्ही यावर उपाय योजला आहे. आत्तापर्यंत एकाही ट्विटर अकाऊंटचा मिस युज झाल्याची तक्रार आमच्याकडे आलेली नाही. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून सगळ्या युजर्सनी त्यांचा स्टोअर्ड पासवर्ड त्वरित बदलावा असे आम्ही सुचवत आहोत.

मोबाइल, लॅपटॉप किंवा कोणत्याही गॅजेटवर तुम्ही ट्विटर अकाऊंट वापरत असाल तर तिथला तुमचा पासवर्ड तुम्ही त्वरित बदलावा असे ट्विटरने म्हटले आहे. या स्वरूपाचा बग पुन्हा येऊ नये यासाठी आम्ही आवश्यक ती खबरदारी घेतो आहोत असेही ट्विटरने आपल्या अधिकृत प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. सध्याच्या घडीला ट्विटर या सोशल नेटवर्किंग साइटचे जगभरात ३३० दशलक्ष युजर्स आहेत. या सगळ्यांनाच पासवर्ड बदलण्याचे आवाहन ट्विटरने केले आहे. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे.