08 March 2021

News Flash

काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

कुपवाडा जिल्ह्यातील हांडवाडा भागामध्ये लष्करे तैय्यबाच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय लष्कराला सोमवारी यश आले.

| March 10, 2014 04:59 am

कुपवाडा जिल्ह्यातील हांडवाडा भागामध्ये लष्करे तैय्यबाच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय लष्कराला सोमवारी यश आले. यावेळी झालेल्या चकमकीत लष्कराचा एक अधिकारी जखमी झाला.
हांडवाडामधील मलिकपोरा गावामध्ये दहशतवादी लपल्याची माहिती पोलीसांना मिळाल्यानंतर लष्कराच्या साह्याने या भागात शोध मोहीम सुरू करण्यात आली. लष्कराच्या जवानांना बघितल्यावर दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार करण्यास सुरुवात केली. यानंतर जवानांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. दहशतवादी आणि जवानांमध्ये बराच वेळ चकमक सुरू होती.
जवानांच्या गोळीबारात दोन परदेशी दहशतवादी मृत्युमुखी पडले. यावेळी गोळीबारामध्ये मेजर संदीप कोतवाल जखमी झाले आहेत. दहशतवादी लपून बसलेल्या ठिकाणाहून शस्त्रसाठा आणि दारूगोळाही जप्त करण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2014 4:59 am

Web Title: two let militants killed in encounter
टॅग : Kashmir,Militants
Next Stories
1 हरियाणात भाजपसमोर पेचप्रसंग
2 देशात सत्ता धर्मनिरपेक्ष पक्षाची यावी- करुणानिधी
3 ‘पंतप्रधानपदासाठी डझनभर कपडे शिवलेल्या नेत्यांची युती म्हणजे तिसरी आघाडी’
Just Now!
X