उज्जैन हिंदू मंदिराच्या नावावरुन सुरु झालेल्या वादामध्ये काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी तसेच काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यावर आक्षेपार्ह भाषेमध्ये टीका करण्यात आली आहे. आवाहन आखाड्याचे संत महामंडलेश्वर आचार्य शेखर यांनी या प्रकरणावर भाष्य करताना एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. आचार्य शेखर यांनी राहुल गांधींचा उल्लेख मंदबुद्धी असा करत त्यांना ब्राह्मी पिण्याचा सल्ला दिला आहे. तसेच आचार्य शेखर यांनी राहुल यांना उज्जैनला येण्याचं आमंत्रणही दिलं आहे.

उज्जैनमधील चिंतामण गणेश मंदिर स्थानकातील पाटील उर्दू भाषेत असण्यावरुन सुरु झालेल्या वादाला राजकीय वळण मिळालं आहे. राहुल गांधी यांनी मदरश्यांसंदर्भात केलेलं वक्तव्य आणि प्रियंका गांधी यांनी मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेण्यावर आचार्य शेखर यांनी टीका केली आहे. यासंदर्भात आचार्य शेखर यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी राहुल यांना मंदबुद्धी म्हटलं. तसेच त्यांनी उज्जैनमध्ये येऊन ब्राम्ही प्यावी असा खोचक सल्लाही आचार्य शेखर यांनी दिला. प्रियंका गांधी यांच्यासंदर्भात भाष्य करताना, निवडणुकांच्या कालावधीमध्ये मत मागण्यासाठी दोघे बहुरुपी मदिरांमध्ये जात आहे. जनतेने त्यांच्यापासून सावध राहण्याची गरज आहे, असं आचार्य शेखर यांनी म्हटलं असल्याचं वृत्त न्यूज १८ ने दिलं आहे.

आणखी वाचा- “आणीबाणी लावणं एक चूक होती, पण…”; राहुल गांधींचं मोठं विधान

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना पाकिस्तानमधील मदरश्यांशी केली आहे. यावरुनच आवाहन आखाड्याचे संत नाराज आहेत. राहुल गांधींनी केलेली तुलना चुकीची असल्याचे मत आचार्य शेखर यांनी व्यक्त केलं आहे. राहुल गांधींना बुद्धी कमी असल्याचे मतही आचार्य शेखर यांनी व्यक्त केलंय. राहुल गांधी पाकिस्तानला खुश करण्याचा प्रयत्न करत असल्याने ते अशी वक्तव्य करत आहेत. माझा काँग्रेसचा एक सल्ला आहे. या मंदबुद्धी माणासाला हटवा आणि त्याला ब्राम्ही प्यायला द्या, असा टोला आचार्य शेखर यांनी लगावला आहे. तसेच उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये राहुल यांना मामाच्या गावी पाठवायला पाहिजे किंवा उज्जैनला पाठवा. त्यांना उज्जैनला पाठवल्यास त्यांचा मेंदू तल्लख व्हावा म्हणून त्यांना ब्राम्ही पाजता येईल, अशी टीकाही आचार्य शेखर यांनी केलीय.

आणखी वाचा- “राहुल गांधी माफी मागता मागता थकून जातील पण …”; चंद्रकांत पाटलांची गंभीर टीका

प्रियंका आणि राहुल गांधी हे अनेक मंदिरांमध्ये जात असल्याच्या मुद्द्यावरुन आचार्य शेखर यांनी, दोघांनीही गर्वाने आम्ही हिंदू असल्याचं सांगावं असं म्हटलं आहे. कधी ते मंदिरात जातात, कधी रुद्राक्षच्या माळा घालतात तर कधी क्रॉस घालून फिरतात तर कधी टोपी घालतात. अनेक प्रकारचे बहुरुपी सध्या फिरत आहे. कधी ते चिकन कुरकुरे खाऊन मानसरोवर यात्रेला जातात, जनतेने अशा बहुरुप्यांपासून सावध राहिलं पाहिजे, असा टोलाही आचार्य शेखर यांनी लागवला.