News Flash

विजय सेतुपतीच्या मुलीला बलात्काराची धमकी; मुरलीधरनच्या बायोपिकमध्ये करणार होता काम

हे कोणी बदलू शकत नाही का? असा सवाल चिन्मयीने तिच्या टि्वटमध्ये विचारला आहे.

तामिळ सिनेस्टार विजय सेतुपतीने क्रिकेटपटू मुथय्या मुरलीधरनच्या जीवनावर आधारित ‘800’ या सिनेमातून माघार घेतली आहे. विविध स्तरांतून येणाऱ्या दबावामुळे त्याला हा निर्णय घ्यावा लागला. इतकंच नव्हे तर एका ट्रोलरने सोशल मीडियावरुन विजय सेतुपतीला, तुझ्या मुलीवर बलात्कार करू अशी धमकी दिली आहे. तुझ्या मुलीवर बलात्कार केल्यानंतर तुला तामिळ लोकांचं दु:ख समजेल, अशी आक्षेपार्ह भाषा टि्वटमध्ये वापरली होती. अशा पद्धतीच्या कमेंटसाठी अनेक नेटीझन्सनी त्या ट्रोलरला फैलावर घेतले.

विजय सेतुपतीला अशा पद्घतीची धमकी देणाऱ्या त्या टि्वटचा गायिका चिन्मयी श्रीपदाने निषेध केला असून, तिने चेन्नई पोलिसांना ते टि्वट टॅग केले आहे. अशा प्रकारे बलात्काराची धमकी देणं, हा गुन्हा आहे. हे कोणी बदलू शकत नाही का? असा सवाल चिन्मयीने तिच्या टि्वटमध्ये विचारला आहे.

अलीकडेच भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला एका ट्रोलरने मुलीवर बलात्कार करण्याची धमकी दिली होती. या ट्रोलरला पोलिसांनी अटक केली.

आणखी वाचा- विजय सेतुपतीची मुथ्थया मुरलीधरनच्या बायोपिकमधून माघार

काय आहे संपूर्ण प्रकरण?
श्रीलंकेचा माजी फिरकीपटू मुथ्थया मुरलीधरनच्या आयुष्यावरील ८०० या बायोपिकमधून दक्षिणेतील अभिनेता विजय सेतुपती याने माघार घेतली आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात जास्त विकेट घेणाऱ्या मुथ्थया मुरलीधरनच्या जीवनावर आधारीत या चित्रपटामध्ये विजय सेतुपती मुख्य भूमिका साकारणार होता. मात्र निर्मात्यांनी चित्रपटाची घोषणा केल्यानंतर सोशल मीडियावर या चित्रपटाला जोरदार विरोध सुरू झाला. त्यामुळे विजय सेतुपतीला या चित्रपटातून माघार घ्यावी लागली. मुथ्थया मुरलीधरननं लिहिलेलं एक पत्र ट्विट करत विजय सेतुपतीने या चित्रपटाला रामराम ठोकला आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2020 12:00 pm

Web Title: vijay sethupathis daughter gets rape threats after exit from muttiah muralitharan biopic 800 dmp 82
Next Stories
1 राहुल गांधींनी शब्द पाळला, सर्वस्व गमावलेल्या ‘त्या’ बहिणींना दिल्या घराच्या चाव्या
2 महाराष्ट्रात उत्तर प्रदेशपेक्षा अधिक बेरोजगारी, जाणून घ्या नेमकी आकडेवारी
3 दसरा-दिवाळी स्पेशल : आजपासून ४० दिवसांसाठी रेल्वेच्या ३९२ विशेष ट्रेन्स
Just Now!
X