दिल्लीत शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर मोर्चादरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये मोठा संघर्ष झाला असून ठिकठिकाणी आंदोलकांकडून तोडफोड आणि पोलिसांकडून लाठीचार्जच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना शांततेचं आवाहन केलं आहे.

कुणी तलवारी उपसल्या तर कुणी बसगाड्या फोडल्या… शेतकरी आंदोलनाचे मन सुन्न करणारे PHOTOS

राहुल गांधी यांनी ट्विट करुन म्हटलं की, “हिंसा कुठल्याही समस्येचं उत्तर नाही. जखम कुणालाही होवो नुकसान आपल्या देशाचचं होणार आहे. देशहितासाठी कृषीविरोधातील कायदे मागे घेण्यात यावेत.”

आणखी वाचा- …अन् संतप्त शेतकऱ्यांमध्ये अडकलेल्या ‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्यासाठी तो एकटा धावला

नव्या कृषी कायद्यांविरोधात दिलेल्या वेशीवर आंदोलन करणारे शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर मोर्चा काढला आहे. सुप्रीम कोर्टाने मध्यस्थी करण्यास नकार दिल्यानंतर दिल्ली पोलिसांनी मोर्चाला परवानगी दिली. कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून दिल्लीच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राजपथावरील संचलन पार पडल्यानंतर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यास शेतकऱ्यांना परवानगी आहे.