News Flash

कोविड योद्ध्यांना लसीकरणासाठी नोंदणीची गरज नाही -आरोग्य मंत्रालय

दहा दिवसांमध्ये लसीकरण सुरू करण्यास आम्ही सज्ज असल्याचे आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी सांगितले.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून करोना लसीकरणा संदर्भात एक मोठी माहिती देण्यात आली आहे. लसींना मंजुरी मिळाल्याच्या दहा दिवसांमध्ये प्रत्यक्ष लसीकरणास सुरूवात होऊ शकते. असं आरोग्य मंत्रालयाने पत्रकारपरिषद घेत सांगितलं आहे. डीसीजीआयने ३ जानेवारी रोजी लसींना मंजुरी दिली होती, त्यामुळे आता १३ ते १४ जानेवारीपर्यंत प्रत्यक्ष लसीकरणास देशात सुरूवात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  कोविड योद्ध्यांना लसीकरणासाठी नोंदणीची आवश्यकता नसणार आहे. दहा दिवसांमध्ये लसीकरण सुरू करण्यास आम्ही सज्ज आहोत, आता अंतिम निर्णय सरकारला घ्यायचा आहे, असं देखील  यावेळी  सांगण्यात आलं आहे.

आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी पत्रकारपरिषदेत या संदर्भात माहिती देताना सांगितले, सरकार १० दिवसांच्या आतमध्ये करोना लसीकरण कार्यक्रमास सुरूवात करण्यास तयार आहे. करोना वॅक्सीनला मंजुरी मिळालेली असल्याने दहा दिवासांच्या आत प्रत्यक्ष लसीकरण कार्यक्रम सुरू केला जाऊ शकतो.

भारतात सीरम आणि ऑक्सफोर्डने तयार केलेल्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींना आपात्कालीन वापरासाठी संमती देण्यात आली आहे. डीसीजीआयने पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिलेली आहे.

जगासोबत तुलना करायची झाली तर दहा लाख लोकसंख्येमागे सर्वांत कमी रुग्ण आपल्या देशात आढळत आहेत. आपल्याकडे आढळत आहेत. आपल्याकडे प्रमाण ७ हजार ५०४ केसेस इतकं आहे. अनेक देश असे आहेत, जिथं २२ हजार, ३५ हजार, ४० हजार एवढच नाही तर ६० हजारापेक्षाही जास्त केसेस आढळत आहेत.

मृत्यू दराबाबत बोलायचं झालं तर भारतात १०८ मृत्यू हे दहा लाख लोकसंख्येमागे होत आहेत. तर, अन्य देशांमध्ये १२०० पर्यंत मृत्यू होत आहेत.अॅक्टिव्ह केसेस आपल्याकडे दहा लाख लोकसंख्येमागे १६७ आहे. तर, यूएसएमध्ये २४ हजारांहून अधिक आहे. ईटलीमध्ये ९ हजाराहून अधिक आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2021 5:22 pm

Web Title: we are prepared to roll out vaccine within 10 days of emergency use authorisation approvals rajesh bhushan msr 87
Next Stories
1 गृहिणींना पगार देण्याचं थरुरांनी केलं स्वागत; कंगना म्हणाली, “जोडीदारासोबतच्या सेक्ससाठी…”
2 ममता बॅनर्जी सरकारला आणखी एक झटका; क्रीडामंत्री लक्ष्मी रतन शुक्लांचा राजीनामा
3 १२ वर्षीय मुलीवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; लचके तोडल्याने जागेवरच सोडले प्राण
Just Now!
X