29 September 2020

News Flash

भाजप खासदाराच्या चमत्कारिक प्रश्नाने लोकसभा थक्क!

लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनीही हा काय प्रश्न आहे, असे चौहान यांना विचारले.

| March 19, 2015 05:07 am

गंगेच्या स्वच्छतेसाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतंत्र मंत्रालय सुरू केले असतानाच त्यांच्याच पक्षाच्या एका खासदाराने गुरुवारी लोकसभेमध्ये प्रश्नोत्तराच्या तासावेळी गंगा नदीसंदर्भात चमत्कारिक प्रश्न विचारून सर्वांनाच धक्का दिला.
भाजपचे खासदार प्रभातसिंह प्रतापसिंह चौहान यांनी गुरुवारी प्रश्नोत्तराच्या तासावेळी गंगा कोठून आली आणि गंगेमध्ये स्नान करण्याने काय परिणाम होतो, असे हटके प्रश्न विचारले. प्रश्नोत्तराच्या तासावेळी वेगवेगळ्या विषयांवरील गंभीर प्रश्न सदस्यांकडून विचारले जातात. यामध्येच चौहान यांनी हसत हसत गंगा नदीविषयी असे प्रश्न विचारल्याने सत्ताधाऱयांसह विरोधकही आश्चर्यचकीत झाले. लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनीही हा काय प्रश्न आहे, असे चौहान यांना विचारले. त्यानंतर जलस्रोत खात्याचे राज्यमंत्री संवरलाल जाट यांनी भगिरथ राजाने गंगा आणल्याचे जुजबी उत्तर देऊन या संपूर्ण विषयावर पडदा टाकला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2015 5:07 am

Web Title: who brought the ganga question by bjp mp in lok sabha
टॅग Ganga,Lok Sabha
Next Stories
1 तंबाखुजन्य पदार्थांसंदर्भातील भारताच्या निर्णयाचे जागतिक आरोग्य संघटनेकडून कौतूक
2 … दलालांच्या याच युक्तीमुळे सामान्यांना रेल्वेची कन्फर्म तिकीटे मिळत नव्हती
3 ‘ऊर्जा संगम’चे २७ मार्चला मोदींच्या हस्ते उद्घाटन
Just Now!
X