News Flash

वीज अधिकाऱ्याला बांधून मारहाण; यशवंत सिन्हा, ३०० कार्यकर्त्यांना अटक

वरिष्ठ भाजप नेते यशवंत सिन्हा व तीनशे पक्ष कार्यकर्त्यांनी वीज पुरवठा खंडित झाल्याच्या कारणास्तव राज्य वीज मंडळ अधिकाऱ्यांना मारहाण केली.

| June 4, 2014 12:12 pm

वरिष्ठ भाजप नेते यशवंत सिन्हा व तीनशे पक्ष कार्यकर्त्यांनी वीज पुरवठा खंडित झाल्याच्या कारणास्तव राज्य वीज मंडळ अधिकाऱ्यांना मारहाण केली. त्यामुळे त्यांना भाजप कार्यकर्त्यांसह अटक करण्यात आली. सिन्हा हे प्रसारमाध्यमांसमोर आले व त्यांनी पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांना झारखंड वीज मंडळाचे महाव्यवस्थापक धनेश झा यांना दोराने बांधण्यास सांगितले.
सिन्हा यांनी सांगितले, की आम्ही सरव्यवस्थापकांचे हात बांधण्यास सांगितले कारण लोकांच्या मुलांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे.
पोलिसांनी सांगितले, की सिन्हा व पन्नास महिलांसह तीनशे भाजप कार्यकर्ते यांनी झारखंड वीज मंडळाचे हजारीबाग विभागात सकाळी नऊ वाजता गेले. तेथे बैठा सत्याग्रह केला, तेथे कर्मचारी कुणाला आत जाऊ देत नव्हते. तीनशेहून अधिक भाजप कार्यकर्त्यांना सिन्हा यांच्यासह अटक करून सदर पोलिस स्टेशनला हजर करण्यात आले. झा यांना बांधून घातल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, असे पोलिस उपअधीक्षत अरविंद कुमार सिंग यांनी सांगितले.
झा यांनी सिन्हा व इतरांविरोधात दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की आपल्याला मानहानीकारक वागणूक देण्यात आली. पोलिस उपअधीक्षकांनी झा यांना महिलांच्या तावडीतून सोडवले. त्यांनी त्यांना बांधून घालून रामगड व हजारीबाग येथे वीज का जाते याबाबत जाब विचारण्यास सुरुवात केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2014 12:12 pm

Web Title: yashwant sinha sent to jail in electricity official assault case
टॅग : Yashwant Sinha
Next Stories
1 ऑस्ट्रेलियात ६० महिला लष्करात सहभागी
2 सुपरनोव्हा स्फोटाची प्रयोगशाळेत निर्मिती
3 बोको हराम संघटना काळय़ा यादीत
Just Now!
X