भिवंडीत १० वर्षीय मुलीवर तिच्या बापानेच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एवढंच नाही तर बलात्कारानंतर बापाने तिचा गळा दाबून हत्या केल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणी ३४ वर्षीय आरोपी बापावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

हेही वाचा- “…तर सामान्य माणसाने काय कारायचं”; दिल्ली वकिलांच्या लाखो रुपयांच्या फी वर केंद्रीय कायदा मंत्र्यांची टीका

आरोपीवर गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने आपल्याच १० वर्षीय मुलीवर बलात्कार केल्यानंतर कपड्याच्या तुकड्याने तिचा गळा दाबून हत्या केली. या घटनेनंतर पीडितेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून आयपीसीच्या कलम ३७६ (बलात्कार), ३०२ (हत्या) आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पॉक्सो) कायद्या अंतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून या प्रकरणाची अधिक चौकशी करण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.