तालिबानी बंडखोरांनी संवेदनशील दक्षिण अफगाणिस्तानात पोलिस चौक्यांवर केलेल्या हल्ल्यात १० अधिकारी ठार झाले.  हेल्मंज प्रांताच्या समन्वय कार्यालयाचे संचालक महंमद इस्माइल होटकी यांनी सांगितले, की तालिबान्यांनी संगीन जिल्ह्य़ात १० पोलिस चौक्यांवर हल्ले केले. तालिबान्यांनी तीन चौक्या ताब्यात घेतल्या व नंतर आगेकूच सुरूच ठेवली.
होटकी यांनी दिलेल्या माहितीनुसार हल्ल्यात दहा अधिकारी ठार तर १६ जण जखमी झाले आहेत, स् मृतांच्या संख्येबाबत परस्परविरोधी माहिती आहे. बारी यांनी दिलेल्या माहितीनुसार ८० टक्के पोलिस चौक्या आमच्या ताब्यात आहेत व दोन चौक्यांसाठी तालिबानशी संघर्ष सुरू आहे.  सुरक्षा दले त्यांच्या हल्ल्यांना तोंड देत असून हेल्मंड प्रांतात पोलिसांनी मोहीम सुरू केली होती पण त्तालिबान्यांनीच त्यांची ताकद दाखवून दिल्याचे चित्र आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 10 afghan police officers killed in taliban assault
First published on: 25-05-2015 at 02:03 IST