कर्नाटकमधील चिंतामणी येथे बस आणि रिक्षा यांच्यात झालेल्या भीषण अपघातात १२ जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दोन्ही वाहनांचा वेग जास्त असल्याने या अपघातात रिक्षाचा चुराडा झाला आहे.
Karnataka: 12 people have died in a collision between an auto rickshaw and a bus in Chintamani. More than 20 injured in the incident. pic.twitter.com/xiCGcYCGPn
— ANI (@ANI) July 3, 2019
तर या अपघातात २० पेक्षा अधिकजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने स्थानिक रूग्णालयात दाखल केले जात आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असुन पुढील कार्यवाही सुरू आहे. जखमींचा परिस्थिती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.