भारताची राजधानी दिल्ली दिवसेंदिवस महिलांसााठी असुरक्षित होऊ लागली आहे. दिल्लीतून सतत बलात्काराच्या बातम्या समोर येत आहेत. गुरुवारी दिल्लीतून सामूहिक बलात्कारांचं आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. नोकरी देण्याच्या बहाण्याने सोशल मीडियावरील मित्रानेच एका तरुणीची फसवणूक केली. तरुणीने यासंदर्भात मालवीय नगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तरुणीचं वय १९ वर्ष इतकं आहे. तिने तिच्या तक्रारीत म्हटलं आहे की, एका व्यक्तीने तिला नोकरी देण्याच्या निमित्ताने मालवीय नगर मेट्रो स्थानकाजवळ यायला सांगितलं होतं. या मुलीने सांगितलं की, सप्टेंबर २०२० मध्ये सोशल मीडियावर अनुभव नावाच्या एका तरुणाशी तिची मैत्री झाली होती. नोकरी मिळवून देतो असं सांगून अनुभवने तिला मालवीय नगर मेट्रो स्थानकाजवळ यायला सांगितलं होतं.

या तरुणीने पोलिसांना सांगितलं की, जेव्हा ती मालवीय नगर मेट्रो स्थानकाजवळ पोहोचली तर तिथे अनुभव त्याच्या मित्रांसोबत एका कारमध्ये बसून वाट पाहत होता. त्यानंतर ही तरुणी कारमध्ये बसली. काही वेळ कारने प्रवास करून आरोपींनी ही कार बेगमपूर परिसरातील एका निर्जन ठिकाणी उभी केली. तिथे दोन तरुणांनी तिच्यावर बलात्कार केला. पीडितेने सांगितलं की, आरोपींनी यावेळी व्हिडीओदेखील चित्रित केला. पोलिसात तक्रार केलीस तर हा व्हिडीओ ऑनलाईन शेअर करू अशी धमकी दिली.

हे ही वाचा >> “विरोधकांना एकत्र आणण्याची सुरुवात झाली”, राहुल गांधींबरोबरच्या बैठकीनंतर शरद पवारांचं विधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुन्हा दाखल

पोलीस उपायुक्त चंदन चौधरी यांनी सांगितलं की, या आरोपींविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६ ड आणि ५०६ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. तसेच लैंगिक गुन्ह्यांपासून मुला-मुलींचे संरक्षण करणाऱ्या कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.