उत्तर प्रदेशच्या इटवाह जिल्ह्यातील बलराई येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. येथील एका २० वर्षीय तरुणीने आपल्या दोन लहान बहिणींचा जीव घेतला आहे. आरोपी तरुणी प्रियकराबरोबर शारीरिक संबंध ठेवत होती, यावेळी लहान बहिणींनी तिला पाहिलं. यामुळे घाबरलेल्या तरुणीने सात आणि पाच वर्षांच्या आपल्या बहिणींची निर्घृण हत्या केली आहे. आरोपी तरुणीला पोलिसांनी अटक केली असून तिने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

‘इंडिया टुडे’च्या वृत्तानुसार, संबंधित घटना इटवाह जिल्ह्यातील बलराई येथे घडली. आरोपी तरुणीचं नाव अंजली आहे. घटनेच्या दिवशी आरोपी तरुणीचे आई-वडील जनावरांना चारा आणण्यासाठी शेतात गेले होते. यावेळी ती आपल्या सात आणि पाच वर्षीय बहिणींसह घरी होती. दरम्यान, तिने प्रियकराला घरी बोलावलं. यावेळी प्रियकराबरोबर आक्षेपार्ह स्थितीत असताना लहान बहिणींनी तिला पाहिलं.

Dr Dharmesh Patel California accident
स्वतःच्या कुटुंबालाच मृत्यूच्या दरीत ढकल्यानंतर भारतीय व्यक्तीला अटक, सुनावणी सुरू असताना समोर आली धक्कादायक माहिती
Goa Police
आईने कडक उपवास करायला लावल्याने दोन भावांचा मृत्यू? दिवसाला केवळ एक खजूर खायचे; गोव्यातील खळबळजनक घटना
98 year old man's reunion with younger brother
सुरकुतलेल्या चेहऱ्यावर उमटलं गोंडस हसू! ९८व्या वर्षी धाकट्या भावाला पुन्हा भेटले आजोबा, पाहा सुंदर Photo
clemen lobo arrested after 36 years in salim cassetwala murder case
वसईतील प्रसिध्द सलीम कॅसेटवाला हत्या प्रकरण; फरार आरोपी क्लेमेन लोबोला ३६ वर्षांनी अटक

हेही वाचा- संतापजनक: बलात्कार करून रस्त्यावर फेकलं; अल्पवयीन मुलीने अर्धनग्न आणि रक्तबंबाळ अवस्थेत मागितली मदत पण…

यानंतर अंजलीने कुदळीच्या साह्याने दोन्ही बहिणींची हत्या केली. तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी तिने कुदळ आणि अंगावरील कपडे धुतले. आई वडील घरी आल्यानंतर दोघींचे मृतदेह घरातील वेगवेगळ्या खोलीत आढळले. या प्रकरणी पोलिसांनी अंजलीला अटक केली असून तिने गुन्ह्याची कबुली दिली आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.