21 year old Illegal Indian immigrant driver arrested as 3 killed in US speeding truck accident Video : अमेरिकेतील दक्षिण कॅलिफोर्निया येथे जशनप्रीत सिंग नावाच्या २१ वर्षीय भारतीय नागरिकाला अटक करण्यात आली आहे. हा व्यक्ती नशेत १८ चाकी ट्रक चालवत होता आणि ट्रकला झालेल्या भीषण अपघातात किमान तीन लोकांचा मृत्यू झाला आहे.
फॉक्स न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, सिंग चालवत असलेला एक सेमी ट्रकने मंद गतीने सुरू असलेल्या ट्रॅफिकमध्ये अनेक वाहनांना उडवले. ही घटना सॅन बर्नाडिनो काउंटीमधील (San Bernardino County) इंटरस्टेट १० वर घडली, ज्यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. डॅश कॅम फुटेजमध्ये दिसून आले की, धडक देण्यापूर्वी ट्रकचे ब्रेक जराही लावण्यात आले नसल्याचे दिसून आले. टॉक्सिकोलॉजी टेस्टमधून आढळून आले आहे की, अपघाताच्या वेळी सिंग हा मादक द्रव्यांच्या प्रभावाखाली होता.
डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटीने सांगितले की, जशनप्रीत सिंग हा कायदेशीरित्या स्थलांतरित झालेला नाही. त्यामुळे त्याच्या अटकेनंतर इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट (ICE) कडून त्याला ताब्यात घेण्यासाठी डिटेनर दाखल करण्यात आले आहे.
या अपघातानंतर जशनप्रीत याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, ज्यामध्ये नशेत वाहन चालवून हत्या करणे याचाही समावेश आहे. सिंगने २०२२ मध्ये अमेरिकेची दक्षिणेकडील सीमा बेकायदेशीरपणे ओलांडली होती आणि त्याची इमिग्रेशन सुनावणी होईपर्यंत त्याला बायडेन प्रशासनाच्या ‘alternatives to detention’ या धोरणांतर्गत देशात सोडण्यात आले होते.
परदेशी नागरिकांसाठी असलेल्या व्यावसायिक वाहन चालवण्याचा परवाना देण्याच्या मानकांची मोठ्या प्रमाणात छाननी केली जात आहे, यादरम्यान ही घटना घडली आहे.
यापूर्वी ऑगस्टमध्ये, हरजिंदर सिंग नावाच्या आणखी एका भारतीय नागरिकावर फ्लोरिडामध्ये झालेल्या एका अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. हरजिंदर सिंगने २०१८ मध्ये बेकायदेशीरपणे अमेरिकेत प्रवेश मिळवला होता आणि त्याला कॅलिफोर्निया कमर्शियल लायसेन्स देखील मिळाले होते. त्या अपघातातही तीन लोकांचा मृत्यू झाला होता.