देशात करोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे आरोग्य यंत्रणा हतबल झाल्याचं चित्र आहे. ऑक्सिजन आणि वैद्यकीय उपकरणांची उणीव भासत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री आणि अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत वैद्यकीय उपकरणं आणि ऑक्सिजनची उणीव दूर करण्यासाठी चर्चा झाली. त्यात करोना लस, ऑक्सिजन आणि आक्सिजन संबंधित उपकरणांच्या आयात शुल्कात तीन महिन्यांची सूट देण्यावर निर्णय झाला. त्याचबरोबर आरोग्य सेसही न घेण्याचा निर्णय झाला आहे.

देशात आरोग्य यंत्रणेला बळकटी देण्यासाठी वैद्यकीय उपकरणं आणि ऑक्सिजनची पूर्तता करण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठकीत जोर दिला. त्याचबरोबर बैठकीत उपस्थित असलेल्या सर्व मंत्री आणि अधिकाऱ्यांना ऑक्सिजन आणि वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा करण्यासाठी एकत्र काम करण्याच्या सूचना दिल्या. तसेच या उपकरणांवरील कस्टम क्लियरंन्स लवकरात लवकर करण्याचे आदेशही देण्यात आलेत. सरकारच्या निर्णयामुळे वैद्यकीय उपकरणं स्वस्तात मिळणार आहेत.

या बैठकीला अर्थमंत्री निर्मला सितारमण, उद्योगमंत्री पियुष गोयल, आरोग्यमंत्री हर्ष वर्धन आणि एम्सचे डायरेक्टर रनदीप गुलेरिया उपस्थित होते.

ऑक्सिजन पुरवठ्यात अडथळा आणणाऱ्यांना फासावर लटकवू; उच्च न्यायालयाचा सज्जड दम

केंद्र सरकारने १० हजार ऑक्सिजन कंन्सट्रोटर मशिन आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील रुग्णालयातील ऑक्सिजनची उणीव दूर करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पुढच्या आठवड्यात अमेरिकेकडून या मशिन भारतात येणार आहे. या मशिन मोकळ्या हवेतून ऑक्सिजन तयार करून पुरवठा करतात.