Rekha Gupta Husbund PWD DUSIB Officers Meeting : दिल्लीच्या राजकारणात मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या पतीमुळे मोठा गोंधळ चालू झाला आहे. रेखा गुप्ता यांचे पती मनीष गुप्ता सार्वजनिक बांधकाम (PWD) व दिल्ली शहरी निवारा सुधार मंडळाच्या (DUSIB) अधिकाऱ्यांच्या बैठका घेत असल्याचा दावा आम आदमी पार्टीने केला आहे. यासंबंधीचे कथित फोटो देखील त्यांनी समाजमाध्यमांवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अधिकारी मनीष गुप्ता यांच्याशी बातचीत करत असल्याचं दिसत आहे.

हे फोटो शेअर करत आम आदमी पार्टीने प्रश्न उपस्थित केला आहे की मुख्यमंत्री रेखा गुप्ता दिल्ली सांभाळण्याइतक्या सक्षम नाहीत का? आता त्यांच्या पतीला दिल्लीची जबाबदारी सांभाळावी लागणार आहे का?

आतिशी यांचा गुप्ता यांच्यावर आरोप

दिल्ली विधानसभेतील विरोधी पक्षनेत्या आतिशी यानी एक्सवर काही फोटो शेअर केले आहेत. यासह त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की “हे फोटो जरा काळजीपूर्वक पाहा. एमसीडी, डीजेबी, पीडब्ल्यूडी आणि डीयूएसआयबी अधिकाऱ्यांची बैठक घेणारी ही व्यक्ती दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांचे पती मनीष गुप्ता आहेत.

आतिशी यांच्याकडून मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची महिला सरपंचाशी तुलना

आतिशी मार्लेना म्हणाल्या, “पूर्वी आपण ऐकायचो की एखाद्या गावात महिला सरपंच निवडून आली असेल तर तिचे सरकारी काम तिचा पती सांभाळतो. अशा घटना आपण पाहिल्या आहेत. याबद्दल काहीजण म्हणतात की सरकारी काम गावातील महिलांना कसं हाताळायचं ते माहिती नसतं. म्हणून सरपंच-पती ती कामे सांभाळतात. परंतु, अलीकडच्या काळात असे प्रकार कमी झाले आहेत. काही ठिकाणी पूर्णपणे बंद झाले आहेत. कारण, त्यास मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता. त्यानंतर महिला सरपंचांना त्यांच्या जबाबदाऱ्या सांभाळण्याचं प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुख्यमंत्री-पतीने सरकार चालवणं अत्यंत धोकादायक : आतिशी

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिशी म्हणाल्या, “आता महिला सरपंच त्यांची सरकारी कामे करू लागल्या आहेत. मात्र, देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडतंय की एखादी महिला मुख्यमंत्री झाली आहे आणि तिची सर्व सरकारी कामे तिचे पती करत आहेत. रेखा गुप्ता यांना सरकारी कामे कशी करायची ते माहिती नाहीये का? दिल्लीत अनेक ठिकाणी सलग काही तास वीजपुरवठा खंडित होत आहे, मुख्यमंत्र्यांना त्यांची कामे कशी करायची ते माहिती नसल्यामुळे हे घडतंय का? रेखा गुप्ता वीज कंपन्यांचे व्यवस्थापन करू शकत नाहीत का? खासगी शाळांचं शुल्क (फी) वाढवण्यात आलं आहे याचं कारणही तेच आहे का? रेखाजी शिक्षण विभाग सांभाळू शकत नाहीत का? मुख्यमंत्री-पतीने सरकार चालवणं अत्यंत धोकादायक आहे.