भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा भाग म्हणून शुक्रवारी उत्तर प्रदेशच्या झाशी जिल्ह्यातील बुंदेलखंड येथील जाहीर सभेला संबोधीत करणार आहेत.
कानपूरच्या यशस्वी सभेनंतर मोदींची उत्तर प्रदेशमधील ही दुसरी प्रचारसभा आहे.
भाजपच्या कानपूर येथील सभेला मोठा जनसमूदाय मोदी यांचे भाषण ऐकण्यासाठी उपस्थित होता. त्यामुळे भाजपच्या झाशी समितीवर कानपूर एवढेच लोक सभेसाठी उपस्थित करण्याचा दबाव वाढला आहे. भाजपकडून झाशी येथे होत असलेल्या सभेसाठी दोन लाखांचा जनसमूदाय जमवण्याचे ध्येय ठेवण्यात आले असल्याचे सूत्रांनी सांगितले.
झाशीच्या जीआयसी मैदानावर होणाऱ्या या सभेसाठी भाजपच्या नेत्या व मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंग उपस्थिती लावणार असल्याची शक्यता आहे.  
बुंदेलखंडमध्ये लोकसभेच्या ४ जागा आणि विधानसभेच्या १९ जागा आहेत. या भागामधून भाजपचा एकही खासदार नसून, विधानसभेवर केवळ तीन प्रतिनिधी निवडून आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After kanpur modi heads to bundelkhand in uttar pradesh for campaign rally
First published on: 25-10-2013 at 01:36 IST